💥विरशैव लिंगायत प्रतिष्ठान तर्फे भव्य सत्कार समारंभ संपन्न.....!


💥कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मदन लांडगे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला सत्कार💥


निट परीक्षेमध्ये उत्तम मार्क घेऊन एमबीबीएस मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवल्याबद्दल आदित्य संग्राम मोडक याचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मदन लांडगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.


नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन अनेक विद्यार्थी एमबीबीएस ला लागले त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा यासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी भाग्यनगर, नांदेड येथे  विद्यार्थी व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता, यात आदित्यसंग्राम मोडक, श्री व सौ संग्राम मोडक यांचा सत्कार शरयु ताई यांच्या हस्ते तर प्रतीक्षा शिवसांब वारकड या विद्यार्थिनीचा तिच्या पालकासह तेजस्विनी गोरे यांच्या हस्ते सत्कार केला गेला.


या कार्यक्रमास सोमेश्वर लाहोरकर, सोपानराव आरमळ, सरपंच मांडवा, परभणी, नाईक सर, उद्योजक सुरज चव्हाण,प्रभाकर खानापुरे, देवगुंडे व्यंकटराव, प्रा. शिंदे व्ही एस, मगर सर आदी मान्यवर उपस्थित होते....,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या