💥पुर्णा येथील शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन...!


💥यावेळी शिवसेना शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव यांची प्रामुख्याने उपस्थिती💥

पुर्णा (दि.१७ नोव्हेंबर) - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृर्तीस आज गुरुवार दि.१७ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्णा येथील झिरो टी पॉईंट येथील शिवसेना संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी शिवसेना शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,शिवसेना शहर प्रमुख दलित आघाडी प्रक्षितदादा सवनेकर,युवासेना तालुका प्रमुख बंडूअप्पा बनसोडे,माणिक सूर्यवंशी,सोमनाथ शिराळे,अतुल बाबर,किरण कदम,सुमित चावरे,सुदाम ढोणे,दयानंद ठाकूर,विठ्ठल कदम,बालाजी पिसाळ,गणेश वळसे,बालाजी कदम आदी नेते पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या