💥वैकुंठवासी संत मारोतराव महाराज दस्तापुरकर यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे थेट विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून प्रस्थान...!


💥ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी सोहळ्यात चालणाऱ्या सर्व भाविकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली💥

परभणी/ प्रतिनिधी.

पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र  पद्मावती- दस्तापुर येथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किर्तन महर्षी वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापुरकर पायी दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्याचा 28 दिवसाचा प्रवास असतो आणि कार्तिकी एकादशीला हा दिंडी सोहळा पंढरपूर येथे पोहोचत असतो आणि गोपाळकाल्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी दिनांक 8 नोव्हेंबर मंगळवार रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून श्री विठ्ठल रुक्मिणी  मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन  समाधी सोहळा निमित्त आळंदी येथे दिंडी चालत जात असते तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले यावेळी विठ्ठल महाराज वासकर. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर. कीर्तन केसरी अच्युत महाराज दस्तापुरकर ,(मालक)अशा अनेक भक्तजनांच्या उपस्थितीत व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य दिंडीतील प्रल्हाद महाराज घटंगेकर. माऊली महाराज खडकवाडीकर .माणिक महाराज रेंगे .गंगाधर महाराज तरोडेकर. शिवाजी महाराज पिंगळीकर. माऊली महाराज भेंडेवाडीकर. यांच्या उपस्थितीत आळंदीकडे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते या दिंडीचे चालक व मालक हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी सर्व सोहळ्यात चालणाऱ्या सर्व भाविकांची  जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तरी आपण कैवल्य सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या