💥पत्रकार विश्वंभर वन्नेंच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या नायगावच्या पत्रकारांचे कौतुक....!

 


💥अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले नायगावच्या पत्रकारांचे कौतुक💥

 ✍️ मोहन चौकेकर 

नांदेड जिल्ह्यातील नायगावचे पत्रकार विश्वंभर वन्ने यांच नुकतंच अल्पशा आजारानं निधन झालं. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी मागं ठेऊन गेलेल्या वन्ने याचं कुटुंब रस्त्यावर आलं. घरात एकमेव कमवती व्यक्ती ती अचानक निघून गेली. कल्पना करा, त्या कुटुंबावर काय वेळ आली असेल ते? नायगाव तालुका मराठी पत्रकार संघ वन्ने कुटुंबाच्या मदतीला धावून आला .पिकोफॉलची मशिन विश्वंभर वन्ने यांच्या पत्नीला घेऊन दिली काही आर्थिक मदत केली मला कल्पना आहे ही मदत तुटपुंजी आहे उभं आयुष्य यातून निभावणार नाही मात्र यातील भावना  आम्ही "जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी" पत्रकारांच्या पाठिशी आहोत हे दाखवून देणारी असलयानं मला नायगाव तालुका पत्रकार संघाचं विशेष कौतूक वाटतं.. पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद.

पत्रकार आज एकाकी आहे. तो ज्या माध्यम समुहासाठी काम करतो ते मालक त्याच्याबरोबर नाहीत, सरकार पत्रकारांच्या प्रश्नांची कायम उपेक्षा करते म्हणून सरकारही बरोबर नाही आणि ज्या समाजाचा कैवार घेत पत्रकार आपलं आयुष्य वेचत असतो तो समाजही पत्रकाराबरोबर नाही. त्यामुळंच पत्रू विश्वंभर वन्ने गेल्यानंतर समाज मदतीसाठी पुढं आला नाही. अशा स्थितीत संघटीत होणं एकमेकांना कुटुंबासारखी मदत करणं एवढंच पत्रकारांच्या हाती राहतं . नायगाव तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांमध्ये ही भावना दिसते. त्यामुळे पत्रकार मित्राच्या मृत्यू पश्चात देखील त्याच्या कुटुंबाची काळजी घेताना ते दिसत आहेत.मराठी पत्रकार परिषदेची ही चळवळ एवढ्यासाठीच आहे. परत एकदा नायगाव तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन.

✍🏻मोहन चौकेकर

 मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या