💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - देश/विदेशातील महत्वाच्या हेडलाईन्स......!


💥नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात 'मित्र' संस्थेची स्थापना होणार, केंद्र सरकारने दिली मंजुरी💥

 ✍️ मोहन चौकेकर

1. आशियाई चॅम्पियनशीप: भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी; भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, परवीन हुडा, सवेटी व अल्फिया पठाणनं मिळवलं सुवर्णपदक

2. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात 'मित्र' संस्थेची स्थापना होणार, केंद्र सरकारने दिली मंजुरी

3.पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावालांना कोटींचा गंडा, 4 जणांना बिहारमधून अटक; पुणे पोलिसांची कारवाई

4.ट्विटर हाती येताच निर्णयांचा धडाका: ऑफिसमध्ये घालवावे लागणार 40 तास, इलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना पुन्हा धक्का

5. शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील साईबाबांच्या समाधीला भक्तांना आता स्पर्श करून दर्शन घेता येणार, साईभक्तांसाठी आनंदाची बातमी

6.उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, खासदार गजानन कीर्तीकरही शिंदे गटात दाखल, पण मुलगा अमोल कीर्तिकर ठाकरे गटात

7.मोठ्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना झटका: ट्विटर, फेसबुकनंतर आता अमेझॉनने 3500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

8. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणे चुकीचे; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर काँग्रेस पक्ष नाराज

9. भारताने वाचवले 34 हजार कोटी रुपये! सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून इंधन खर्चात केली मोठी बचत

10. डॉक्टरांनी रुग्णांना दिलेले प्रिस्क्रिप्शन सर्वच भाषांत वाचता येणार आणि ऐकताही येणार, नाशिकच्या हॅकेथॉनमध्ये सहभागी विध्यार्थ्यांनी तयार केलं ॲप...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या