💥पुर्णेतील बाजारपेठेतून अज्ञात भामट्याने पळवले सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे भरदिवसा २० हजार रुपये...!


💥सायकल वरील डिक्कीतून पैसे काढतेवेळी चोरटा सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद💥 


पुर्णा (दि.२९ नोव्हेंबर) - पुर्णा शहरातील पोलिस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरील मुख्य बाजारपेठेतल्या गोविंदराज प्रोव्हीजन किराणा दुकानावर खरेदी करण्यास आलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या सायकल वरील डिक्कीतून अज्ञात चोरट्याने तब्बल २० हजार रुपये अगदी सहजपणे पळवल्याची गंभीर घटना दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ०१-३७ ते ०१-४० वाजेच्या सुमारास घटल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.


या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की येथील शहरातील व्यंकटी प्लॉट परिसरातील रहिवासी वयोवृध्द सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी सय्यद उस्मान सय्यद अली यांनी बँकेतील आपल्या खात्यातून २० हजार रुपये काढून आणले व ते काही किराणा वस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने ते मुख्य बाजारपेठेतील आयडीया पॉईंट लगत असलेल्या 'गोविंदराज प्रोव्हीजन' या किराणा दुकाणात गेले असता याच वेळेचा फायदा घेऊन त्यांच्या पाळतीवर असलेल्या एका अज्ञात भामट्याने त्यांच्या सायकल वरील डिक्कीतून २० हजार रुपये अगदी सहजपणे पळवले हि चोरीची घटना संबंधित किराणा दुकानातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटने संदर्भात पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील 'गोविंदराज प्रोव्हीजन' ही किराणा दुकान पुर्णा पोलिस स्थानकाच्या पुर्व गेटलगतच असून सदरील गंभीर प्रकार भर दिवसा घडल्यामुळे शहरात सर्वत्र खळबळ माजली आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या