💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षेत झालेल्या लोकशाही दिनात दोन अर्ज प्राप्त....!


💥नागरिकांच्या तक्रारी, समस्या किंवा त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते💥

परभणी (दि.07 नोव्हेंबर) : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षेत झालेल्या  जिल्हास्तरीय लोकशाही दिनी एकूण दोन तक्रार अर्जावर सुनावणी घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कैलास तिडके, अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हट्टेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी, शिक्षणाधिकारी (प्रा.) विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्यासह सर्व संबंधीत विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.  

जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी, समस्या किंवा त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नागरिकांच्या ज्या विभागांकडे तक्रारी किंवा अडचणी प्रलंबित आहेत. त्याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करुन तक्रारी वेळेत निकाली काढल्यास नागरिकांमध्ये शासन-प्रशासनाप्रती सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते. प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रार किंवा अडचणीची वेळेत दखल घेवून त्यावर योग्य कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यावेळी म्हणाल्या.लोकशाही दिनात आज प्राप्त झालेल्या दोन अर्जांचा अहवाल प्राप्त झाला असून एका प्रलंबित अर्जावर सुनावणी झाली.....


-*-**-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या