💥परभणी येथे एकात्मिक शेती व गांडूळ निर्मिती प्रशिक्षण संपन्न....!


💥प्रशिक्षणाचे आयोजन रिलायंस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते💥

परभणी (दि.22 नोव्हेंबर) - येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी रिलायन्स फाउंडेशन,उमेद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे एकदिवसीय एकात्मिक शेती पद्धती व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन रिलायंस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

यामध्ये मुख्य अतिथी म्हणून अभियान व्यवस्थापक श्री.संदीप  भालेराव  तालुका अभियान व्यवस्थापक परभणी उपस्थित होते. तसेच श्री. कृष्णा मेटकर उमेद , श्री.रामप्रभू कोरके(जिल्हा व्यवस्थापक-स्मार्ट प्रकल्प)श्रीमती. स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) कृषि  विभाग परभणी श्री. भुषण रेंगे(संचालक-दत्तप्रयाग शे.उ.कं जांब) श्री. नारायणराव धस (संचालक-धनसंचय शे. उ. कं. राहाटी) श्रीमती सुकेशनी चौधरी,(संचालक-निरिश म.शे.उ.कं.असोला) रिलायंस फाउंडेशनचे श्री. रावसाहेब परमार, श्री. अमोल खंडागळे,  श्री. अमन परमार यांची देखील विशेष उपस्थिती होती.

वाढत्या रासायनिक खतांचा व कीटकनाशकांच्या अति वापराने दिवसेंदिवस शेतीची सुपीकता कमी होत चालली आहे. तसेच शेतीची उत्पादन क्षमता देखील कमी होत आहे. तसेच त्याचा मानवी शरीरावर देखील दूरगामी परिणाम होत आहेत. यासाठी एकात्मिक शेती पद्धती तसेच शेतामध्ये जास्तीत जास्त गांडूळ खत महत्व, विपणन, शेणखत,इतर शेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे.

बचत गटांच्या माध्यमातून गाव स्तरावर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तयार करून त्याची ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंग साठी महिलांना व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा या प्रशिक्षनाचा उद्देश होता.

या दरम्यान बोलतांना श्री कृष्णा  मेटकर (DM MIS) उमेद अभियान यांनी महिलांना शेंद्रिय शेतीचे फायदे,भविष्यातील संधी व उपलब्ध बाजारपेठ,गांडूळ खत निर्मितीचे फायदे,पीक पद्धती,भाजीपाला लागवड व विक्री व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त महिलांनी गांडूळ खत निर्मीती प्रकल्प सुरू करून त्याद्वारे आपल्या उत्पन्नात वाढ करण्याचे आवाहन यावेळी बोलताना केले. यावेळी महिलांना  व शेतकऱ्यांना 65 गांडूळ बेडचे वाटप रिलायन्स फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले.तसेच 5 तालुक्यात एकूण 345 गांडूळ बेडचे वाटप होणार असल्याची माहिती श्री.रावसाहेब परमार यांनी दिली.

पुढे श्री. रावसाहेब परमार याना महिलांना एकात्मिक शेती पद्धती संकल्पना समजावून सांगितली. त्यामध्ये शेतातील काडी करचा व्यवस्थापन, रायझोबियम प्रक्रिया,हवामान आधारित शेती आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

तसेच श्रीमती. स्वाती घोडके कृषी विभाग सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी यांनी महिलांनी गांडूळ खत निर्मिती करून त्या गांडूळ खताचा वापर परत बागेतील भाजीपाल्यासाठी करून आपल्या कुटुंबाचं आरोग्य कसे सुधारता येईल याचे महत्त्व पटवून दिल गांडूळ खत निर्मिती करून विक्री नाही झाली तरी प्रत्येकाने आपल्या शेतातील पिकांना वापर केलाच पाहिजे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे खूप गरजेचे आहे तसेच परसबाग लागवड व त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. व श्री.रामप्रभु कोरके यांनी महिलांना व शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी,शेंद्रिय शेती,गांडूळ खत निर्मिती कशी करायची व त्याची प्रक्रिया,तसेच त्याचे फायदे व व्यावसायिक संधी या विषयी मार्गदर्शन केले.

सदरील प्रशिक्षनासाठी पाथरी तालुक्यातील 81 महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रताविक श्री.रावसाहेब परमार(जिल्हा कार्यक्रम अधिकारी-रिलायन्स फाउंडेशन) यांनी केले तर  सूत्रसंचालन श्री.अमोल खंडागळे (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, रिलायन्स फाउंडेशन परभणी)यांनी केले. आभार श्री. अमन परमार यानी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती. कृष्णा आखमोडे,श्री.देवा कोटंबे,श्री.उद्धव समिंद्रे, श्री.लक्ष्मण खंदारे व उमेद च्या तालुका स्तरीय टीमचे सहकार्य लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या