💥आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा स्वराज्यकडून पुर्णेत तिव्र शब्दात निषेध...!


💥राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तात्काळ राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्याची पंतप्रधान मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी💥 

पुर्णा (दि.२३ नोव्हेंबर) - महाराष्ट्र राज्याचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्यापासून राज्यपाल कोश्यारी हे सातत्याने राज्यासह महापुरुषां बाबत वादग्रस्त व अपमानास्पद विधाने करीत असून राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेस बाधा पोहोचेल असे वर्तन करीत असून नुकतेच त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केले असल्यामुळे आज बुधवार दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी पुर्णा तालुका स्वराज्य संघटनेकडून बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांच्यासह भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा तिव्र शब्दात निषेध करीत स्वराज्य संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक साहेबराव कल्याणकर व जेष्ठ मार्गदर्शक माधवराव अवरगंड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसिलदार यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

स्वराज्य संघटनेच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच महाराष्ट्र राज्याची संस्कृती व परंपरा येथील अर्थकारण मराठी अस्मिता या बाबत सातत्याने बेताल भाष्य करुन राज्यपाल कोश्यारी राज्यातील जनतेच्या भावनांचा अपमान करीत असल्यामुळे त्यांच्या या बेजवाबदार वर्तणूकीमुळे राज्यपाल पदाचे अवमुल्यन होत आहे.

स्वराज्य संघटनेच्या वतीने पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की आपण देशाचे पंतप्रधान या नात्याने एकीकडे नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा यथोचित गौरव करीत आहात अन् दुसरीकडे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे अर्थात महाराष्ट्राचे राज्यपाल पद भुषवणारे राज्यपाल कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक भाषेचा वापर करीत आहेत याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे आपल्याच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी याने देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे या दोन्ही व्यक्तीचा स्वराज्य संघटना तिव्र निषेध करीत असून आपण देशाचे पंतप्रधान या नात्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावनेचा विचार करून बेजवाबदार राज्यपाल कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून पदमुक्त करावे असेही निवेदनात म्हटले आहे.

स्वराज्य संघटनेकडून पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनावर स्वराज्य संघटनेचे माधवराव अवरगंड,साहेबराव कल्याणकर,ज्ञानोबा कदम,लक्ष्मण शिंदे,सोनाजी शिंदे,पवन बोबडे,डिगांबर कदम,गणेश बुचाले,ज्ञानेश्वर कदम,शरद कदम,कपिल किरडे,गोकूळ कदम,दिपक भोसले,संतोष बोबडे,गजानन बोबडे,गणेश बोकारे,विनायक बोकारे,विष्णू बोकारे,ज्ञानेश्वर बोकारे,शेषेराव बोकारे,भागवत शिंदे,सुंदर भोसले,सुनिल भोसले,संदिप खंदारे,बळीराम खंदारे,संदिप कदम,उध्दव बोकारे,नागेश बोकारे,मनोहर बुचाले,माणिका कदम,नवनाथ बुचाले,नरेश कदम,राजेश कदम,चंद्रकांत कुऱ्हे,वैष्णव कुऱ्हे,सतिष कदम,रावसाहेब शिंदे,किसन सोलव,अविनाश सोलव,कैलास पडोळे,गोपिनाथ इंगोले आदींच्या स्वाक्षरी आहेत..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या