💥चिखलीत बहुजन साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न........!


💥काव्य प्रदेशातील स्त्री - या शेकडो पानी समीक्षा ग्रंथाचे जनक किरण शिवहर डोंगरदिवे यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थानी होते💥

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली : साहित्यिक प्रांतात सतत चर्चेत राहीलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखली, जि. बुलढाणाच्या वतीने या वर्षीच्या मध्यावधीत जाहीर झालेल्या व वृत्तपत्रीय तथा दृक्श्राव्य वाहीनीवर नियमितपणे आपले नांव झळकत ठेवणाऱे राज्यस्तरीय ५ वे " बहुजन साहित्य संमेलन- २०२२  महाराजा अग्रसेन साहित्य परिसर, शिक्षण महर्षी पंढरीनाथ पाटील विचार मंच, महाराजा अग्रसेन रिसॉर्ट, चिखली, जि. बुलढाणा येथे अतिशय थाटामाटात संपन्न झाले. 

साहित्य विश्वात अगदी मुद्रणावस्थेपासूनच आपले आगळे-वेगळे अस्तित्व दाखविणाऱ्या -  काव्य प्रदेशातील स्त्री - या शेकडो पानी समीक्षा ग्रंथाचे जनक मा. किरण शिवहर डोंगरदिवे यांनी संमेलनाचे अध्यक्षपद तर संमेलनाच्या उदघाटनाची भारदस्त जबाबदारी नाट्य व वैचारिक क्षेत्रातील सन्मान्य पुरस्कार प्राप्त विचारवंत डॉ. ऋषीकेश कांबळे सर, औरंगाबाद यांनी उचललेली अन् सोबंतच स्वागताध्यक्ष म्हणून अत्यंत संवेदनशील आणि संयमपुर्ण संयोजनसंपन्नतेचा भार सर्व भारतभर सुपरिचित असलेले उर्दू शायर - गझलकार मा. डॉ. गणेश गायकवाड, बुलढाणा यांनी सोत्साह स्विकारलेली. दुग्धशर्करा योग म्हणजे नुकतीच ज्यांची, महाराष्ट्राच्या उप-मुख्यमंत्रीमहोदयांचे स्वीय - सचिव म्हणून नियुक्ती झाली असे मा. विद्याधरजी महाले यांनी, संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, सचिव शाहीर मनोहर पवार अन् निमंत्रक ज्येष्ठ कवी- कथाकार बबन महामुने यांच्या विनंतीला मान देऊन संमेलनाच्या उदघाटनसत्रात आवर्जून दिलेली उपस्थिती आणि आदरपूर्वक व्यक्त केलेले मनोगत. मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून निघालेली भव्य दिव्य संविधान ग्रंथ दिंडी, हर्षोल्हासात पार पडलेला उदघाटन सोहळा, सन्मानपूर्वक झालेले स्वागत-सत्कार, बहुमानाने मानवीय सेवा तथा ईतरही क्षेत्रामधे समर्पित कार्य करणाऱ्या विद्वत्जनांना सादर प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कार वितरणाचा समारंभ, एक पहल तथा ईनर्वीन विल या महिला गृप व क्लब कडून मान्यवरांचा झालेला हृद्य सत्कार, मान्यवरांची अभ्यासपूर्ण व विचारांना चालना देणारी भाषणे, मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री तथा अंतर्राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन शास्त्रीय नृत्य स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून निमंत्रित असलेल्या रेणू जोशी यांचे शास्त्रीय नृत्याविष्करण, शाहीरांनी सादर केलेला सांस्कृतिक कला संगीताचा मनोवेधक कार्यक्रम, चिंतनीय परिसंवाद, रसग्रहणीय काव्यसंमेलन अन् त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र व त्याबाहेरूनही आलेली काव्यरसिक मंडळी, लक्षणीय समारोप आणि पारीत करण्यात आलेले विधायक पाच ठराव आणि उल्लेखनीयरित्या  लाभलेली राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर्पमित्र वनिता बाराडे यांची उपस्थिती आणि त्यांच्या हस्ते संमेलन सहभागी मान्यवरांचा झालेला सत्कार, प्रदान करण्यात आलेली स्मृती चिन्हे,सन्मानपत्रे, आणि या सर्वांवर ताण म्हणजे  समर्थ व मनाला वेधून टाकणारे सूत्र संचालन, रसिकांची लाभलेली उपस्थिती अन् विशेष उल्लेखून सांगावे असा महाराजा अग्रसेन रिसॉर्ट,चिखलीचा अत्यंत रमणीय परिसर, त्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले उद्यान.....ही सर्व या  संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणावयास हरकत नाही......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या