💥शेळगाव मराठा येथे महिको सीड्स तर्फे कृषकदिन साजरा.....!


💥यावेळी शेतकऱ्यांना कापूस पिकाबद्दलची माहिती देण्यात आली व भरघोस उत्पन्न घेणारे शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला💥  


             
गंगाखेड  /महिको नवीन वाण बाऊंसर व धनदेव प्लस,जंगी आणि बाहुबली प्लस त्यांचे गुणधर्म नवीन आलेल्या वाणाचे प्रदर्शन सोनपेठ तालुका परभणी जिल्हा शेळगाव मराठा येथे लक्ष्मीकांत देशमुख (माजी जिल्हा परिषद सदस्य परभणी),माजी उपसरपंच रफिक कुरेशी शेळगाव,महिकोचे वितरक हरिभाऊ सावरे,प्रगतशील शेतकरी सय्यद आयुब सय्यद निजामुद्दीन, यांच्या शुभहस्ते करण्यात आला महिकोचे नवीन येणारे वाण बाऊंसर,बाहुबली प्लस,धनदेव प्लस,जंगी गहू वाण मुकुट,८३२१,तारक गोल्ड या प्रदर्शन व त्यांची वैशिष्ट्ये व गुणधर्म प्रदर्शन या कार्यक्रमा प्रसंगी दाखवण्यात आले.


यावेळी शेतकऱ्यांना कापूस पिकाबद्दलची माहिती देण्यात आली व भरघोस उत्पन्न घेणारे शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला हे महिको कापूस व गहू प्रदर्शन पाहण्यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस उत्पादक शेतकरी यांनी मोठ्या हीरहिरीने प्रदर्शन पाहणी करण्यासाठी सहभाग घेतला सोनपेठ तालुका शेळगाव मराठा येथे आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ६२० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता व कृषी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कापूस व पाहणी कार्यक्रमासाठी महिको सीड्स चे झोनल मॅनेजर नाजीम खान सर व रिजनल मॅनेजर दत्ता इथापे सर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन महीको सीड्स चे जिल्हा प्रतिनिधी माधव हत्ते,शुभम भाबट,भगवान मरमट, वैभव मोरे,गोपाळ सोळुंके परभणी जिल्ह्यातील सर्व महिको कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या