💥मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वैष्णवी कुंभार व चि.अर्जुन काळे यांचे सुयश....!


💥दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.धनंजयजी मुंडे यांनी केले अभिनंदन💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा वर्ग 8 वी मध्ये मिलिंद विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी गोपीनाथ कुंभार ही उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र  ठरली आहे.


तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये चि.अर्जुन रमेश काळे इयत्ता 9 वी याने द्वितीय क्रमांक पटकावला दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.धनंजयजी मुंडे, सहसचिव प्रदीप खाडे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या