💥वारकरी साहित्य परिषद वर्धापन दिना निमित्तने भव्य शोभायात्रा व सन्मान सोहळा....!


💥वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांचा ११ वपन दिन सोहळा जिंतूर येथे राम मंदिर मध्ये संपन्न💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

आज दि ११/११/२२ रोजी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांचा ११ वपन दिन सोहळा जिंतूर येथे राम मंदिर मध्ये संपन्न झाला. अकराव्या वर्धापन दिनानिमित्त ह.भ.प रणधीर महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वा. सिद्धेश्वर मंदिरापासून ते राम मंदिर पर्यंत दिंडी काढण्यात आली या दिंडीत तालुक्यातील सर्व वारकरी उपस्थित होते. आज राम मंदिर येथे वारकरी साहित्य वर्धापन दिनानिमित्त सर्व वारकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, प्रमुख पाहुणे श्री हभप महेश चैतन्य महाराज गुरुकुल जिंतूर मैनापुरी संस्थाचे शिवपुरी महाराज, श्री विठ्ठल महाराज जाधव आडगाव तर विनीत मध्ये ज्ञानेश्वर माऊली दाभाडे जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद परभणी, वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष श्री म रणधीर भाऊ माऊली देशमुख यांच्या मार्ग दर्शनाखाली सर्व वारकऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेचचिंतामणी महिला भजनी मंडळाच्यासत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे वारकरी संप्रदायाचे बारकन्यांनी आभार मानले त्यावेळी सूत्रसंचालन श्री ह. भ. प. राजेंद्र महाराज घुगे यांनी केले. नगरसेवक विनास भंडारी यांचा सत्कार करण्यात आला गणेश खवणे, मनोज साळवे, विशाल आव्हाड, माणिक खवणे विश्वास तळेकर सोमेश्वर सातपुते, श्रीराम मित्र मंडळ मित्र मंडळ्यांनी परिश्रम घेतले,....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या