💥आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई : कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मुंबई विमानतळावर ६१ किलो सोने जप्त केले💥
मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सच्या अधिका-यांनी केलेल्या कारवाईत तब्बल ३२ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे आतापर्यतची विमानतळावरून एकाच दिवसात पकडलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मुंबई विमानतळावर ६१ किलो सोने जप्त केले आहे या सोन्याची किंमत सुमारे ३२ कोटी रुपये आहे.
याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची मे.न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मुंबई एअरपोर्ट कस्टम विभागाने दिली आहे अटक करण्यात आलेले आरोपी हे कतार एअरवेजच्या विमानाने मुंबईत आले होते या प्रवाशांना भारतात सोने आणण्यासाठी पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते परंतु, त्यांना भारतातील सीमाशुल्क कायद्याबाबत माहिती नव्हती त्यामुळे हे सर्व जण एवढं सोनं घेऊन आले.
“अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सोने तस्करीच्या रॅकेटशी संबंधित काही लोकांची नावे पोलिसांना दिली आहेत. तपास यंत्रणा त्या लोकांची माहिती काढत आहे अशी माहिती कस्टमच्या वतीने मे.न्यायालयात दिली आहे......
0 टिप्पण्या