💥पुर्णेतील गुणवंत कलाकार संतोष सातपुते यांनी पेनीने साकारले युवराज छत्रपती संभाजी राजे यांचे छायाचित्र...!


💥आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  घराण्याच्या १३ व्या वंशजां प्रती असाही आदर व्यक्त💥


पूर्णा : शहरातील एक गुणवंत कलाकार संतोष नाना सातपुते यांनी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे १३ वे वंशज आदरणीय युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रती आदर व्यक्त करीत पेनाच्या साहाय्याने त्यांचे अत्यंत सुंदर छायाचित्र निर्माण केले आहे.


आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे १३ वे वंशज आदरणीय युवराज छत्रपती संभाजी महाराज हे आज शनिवार दि.१९ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वराज्याची उभारणी करण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या दोऱ्यावर येत आहेत याचे औचित्य साधून हरहुन्नरी कलाकार संतोष नाना सातपुते यांनी आपली कला सादर करत युवराज छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत सुंदर व रुबाबदार असे चित्र रेखाटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या