💥पुर्णा तालुक्यातील माखणीतील जि.प.प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे छत्रपती संभाजी राजे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न...!


💥स्वराज्य संघटनेच्या बांधणीसाठी मा.खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे प्रथमच परभणी जिल्ह्यात💥 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज रायुवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे आज शनिवार दि.१९ नोव्हेंबर रोजी सकाळी परभणी जिल्ह्यात आगमन होताच ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात अभूतपूर्व माखणी नगरीत  स्वागत करण्यात आले. स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे स्वागत करण्यासाठी तरूणांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता.

स्वराज्य संघटनेच्या बांधणीसाठी संभाजी राजे भोसले प्रथमच परभणी जिल्ह्यात आले असता माखणी गावकऱ्यांच्या वतीने ठीक ठिकाणी रांगोळी काढून सजावट केली होती व पारंपारिक पद्धतीने बैलगाडी मध्ये मिरवणूक काढण्यात आली लेझीम पथक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर अशा रीतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखणी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले राजेचा सत्कार ठीक ठिकाणी पूजा करून करण्यात आला तरुणाच्या महिलांचा शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठी गर्दी झाली या  प्रेमाने खासदार संभाजी राजे भारावून गेले होते जिल्ह्यात स्वराज्य संघटनेची उभारणी करण्यासाठी प्रवक्ते करण गायकर प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर निमंत्रक गंगाधर कळकुटी आप्पासाहेब कुडेकर मंगेश देशमुख साहेबराव कल्याणकर नितीन देशमुख माधव आवरगंड   सुरेश मगरे धुराजी होनमंने जनार्धन आवरगंड पत्रकार शाखा आघ्यक्ष विष्णू आवरगंड अगंद आवरगंड संतोष आवरगंड गोविंद आवरगंड बाबुराव आवरगंड दीपक आवरगंड नवनाथ आवरगंड सदाशिव आवरगंड जोशी सर  आदी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या