💥नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात मच्छरदाणी हवी म्हणत आराेपीन मे.न्यायालयात आणली डासांनी भरलेली बाटली.....!


💥कुख्यात गुंड लकडावालाने मे.मुंबई सत्र न्यायालयात चक्क मृत डास भरलेली बाटली आणत ती न्यायाधीशांना दाखवली💥

मुंबई : नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात डासांचा प्रचंड त्रास असल्याचे दाखवण्यासाठी कुख्यात गुंड एजाझ उर्फ अज्जू युसूफ लकडावाला याने मे.मुंबई सत्र न्यायालयात चक्क मृत डास भरलेली प्लास्टिकची बाटली आणत ती न्यायाधीशांना दाखवली तसेच मच्छरदाणी वापरण्यास देण्याचा आदेश तुरुंग प्रशासनाला द्यावा अशी विनंती अर्जाद्वारे केली मात्र मच्छरदाणीची जाळी व ती अडकवण्यासाठी दोऱ्या, खिळे यांचा गैरवापर होऊन सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती तुरुंग अधिकाऱ्याने व्यक्त केल्याने मे.न्यायाधीशांनी लकडावालाची विनंती फेटाळून लावली. 

* नेमकं काय घडलं ?

लकडावाला याला एका खटल्याच्या प्रकरणात मे.विशेष सी.बी.आय. न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले होते या खटल्यात कुख्यात गुंड छोटा राजनही आरोपी आहे तो दिल्लीतील तिहार तुरुंगात असल्याने या सुनावणीला व्हि.डी.ओ. कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होता ‘अन्य खटल्यातील आरोपी व डी. के.राव याच्यासारख्या गुंडांना मच्छरदाणी पुरवण्यात आली आहे मात्र माझ्यासह अनेकांना ती देण्याचे टाळून तुरुंग प्रशासन भेदभाव करत आहे. 

मला २०२०मध्ये मे.न्यायालयीन कोठडींतर्गत तळोजा तुरुंगात पाठवल्यानंतर सुरुवातीला मच्छरदाणी दिली होती मी जवळपास दोन वर्षे ती वापरली मात्र, यावर्षी मे महिन्यात तुरुंग प्रशासनाने काढून घेतली’असे म्हणणे लकडावालाने मांडले त्यावेळी तुरुंग अधिकाऱ्याने महाराष्ट्र तुरुंग नियमावलीतील नियम १७ दाखवून कैद्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मच्छरदाणी बांधण्यासाठी दोऱ्या, खिळे इत्यादी साहित्य पुरवले जाऊ शकत नाही असे मे.न्यायालयाला सांगितले. 

कैद्यांना ‘ओडोमॉस’सारख्या उपायांचा वापर करण्याची मुभा आहे असे सांगत तुरुंग अधिकाऱ्याने लकडावालाच्या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला त्यानंतर ‘ओडोमॉस’सारख्या क्रीमचा वापर करता येईल असे नमूद करत मे.न्यायाधीशांनी लकडावालाचा अर्ज फेटाळून लावला अनेक अर्ज प्रलंबित तळोजा तुरुंगात असलेल्या विविध खटल्यांतील आरोपींकडून मे,विविध न्यायालयांत मच्छरदाणीच्या वापराच्या परवानगीसाठी वारंवार अर्ज येत आहेत डी.के.राव याचा अर्ज एका मे.न्यायालयाने मान्य केला होता. तर एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील काही आरोपींचे याच मागणीचे अर्ज अन्य मे.न्यायालयाने फेटाळून लावले. 

या प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा यासंदर्भातील अर्ज सध्या प्रलंबित आहे तसेच ‘दम्याच्या आजारामुळे ओडोमॉससारख्या क्रीमचा वापर करू शकत नाही’ असे सांगून मच्छरदाणीसाठी विनंती करणारे आरोपी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचाही अर्ज प्रलंबित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या