💥डॉक्टर व मेडिकल यांनी बिलामधून रुग्णांस आर्थिक दिलासा दिल्या बद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठान मार्फत सत्कार....!


💥प्रतिष्ठानच्या वतीने संबंधित डॉक्टर व मेडिकल स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला💥

परभणी :- शहरातील वसमत रोड वरील प्रसिद्ध रुग्णालय स्पंदन आय.सी.यू. रुग्णालय येथे गेल्या 15 ते 16 दिवसांपासून हृदयविकारावर उपचार घेत असलेल्या रुग्णाचे बिल 1,47,000 ( एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये )  झाले होते या बिलातून समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन 23000 हजार रुपय कमी केल्या बद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने संबंधित डॉक्टर व मेडिकल स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला.

अधिक माहिती अशी की स्पंदन आय.सी.यू. रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाचे रुग्णालय बिल 75000 रू. झाले होते मेडिकल बिल 72000 रू. असे एकूण बिल 1,47,000 ( एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये )  झाले होते. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना इतके बिल भरणे शक्य नव्हते. तेव्हा रुग्णाचे नातेवाईक चांद कुरेशी, रियाज कुरेशी  यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे पदाधिकारी तथा पत्रकार रियाज कुरेशी  यांच्याशी संपर्क साधून बिला संधर्भात मदत मागितली, तेव्हा प्रतिष्ठान चे पदाधिकारी रियाज  कुरेशी हे तात्काळ संबंधित रुग्णालयात जाऊन माहिती घेऊन त्यानी तेथील डॉ. प्रभाकर टेकाळे यांच्याशी बिल कमी करण्यासंधर्भात विनंती केली होती. तेव्हा डॉ. टेकाळे यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन संबंधित रुग्णाच्या बीलातून 20000 हजार रुपयाची सुट दिली. त्याच प्रमाणे तेथील साई मेडिकल वर रुग्णाचे बिल 72000 हजार रुपये झाले होते, तेव्हा प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रमोद अंभोरे, रियाज कुरेशी व शेख अझहर आदी पदाधिकाऱ्यांनी मेडिकल वरील बिल कमी करण्या संधर्भात सुनील पिंगळीकर यांना विनंती केली असता त्यांनी एकूण मेडिकल बीलाच्या मधून 3000 रुपये सूट देऊन रुग्णांस आर्थिक दिलासा दिला. असे एकूण 23000 हजार रुपयाचा समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या मध्यस्थीने  रुग्णाच्या नातेवाईकास आर्थिक दिलासा मिळाला. 

 हा आर्थिक दिलासा दिल्या बद्दल स्पंदन हॉस्पिटल चे डॉ. प्रभाकर टेकाळे व साई मेडिकलचे सुनील पिंगळीकर यांचा समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला व साधू ठोंबरे, फारुख सर, अनुराग जाधव, किशोर तलवारे, अशोक चव्हाण आदींचे आभार मानले. या वेळी रुग्णाचे नातेवाईक  राहणार हट्ट, सुल्तान  कुरेशी, मतीन खुरेशी, शाद्दुल कुरेशी,आदींनी समाजहित अभियान प्रतिष्ठान, स्पंदन हॉस्पिटल व साई मेडिकल यांचे आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या