💥मांडवा गावातील प्रतिष्ठीत नागरिक विठ्ठल साखरे यांना पितृशोक....!

 *मांडवा येथील *


💥माणिक यादवराव साखरे यांचे वयाच्या 97 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मांडवा  गावातील प्रतिष्ठीत नागरिक व वारकरी माणिक यादवराव साखरे (97) यांचे शुक्रवारी राहत्या घरी निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल साखरे यांचे ते वडील होत. 

  तालुक्यातील मांडवा येथील माणिक यादवराव साखरे यांचे शुक्रवार,दि.18 नोव्हेंबर  रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता मांडवा भागातील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी माजी आ. संजय दौड व सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह  अधिकारी, कर्मचारी डॉक्टर, वकील, इंजिनिअर प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  स्व. माणिक यादवराव साखरे हे मित्तभाषिक शांत, संयमी, स्वभावाचे व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. ते नेहमी सर्वांशी आपुलकीने आणि जिव्हाळ्याने मिळून-मिसळून राहत होते. धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांनी मोठा सहभाग घेतला होता. अत्यंत मिनमिळावू व सुस्वभावी असल्याने ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाने समाजातील भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल साखरे यांचे ते वडील होत. स्व.माणिक यादवराव साखरे यांच्या पश्चात एक मुले, पाच मुली , सुना, जावई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. साखरे परिवाराच्या दुःखात दै. - - - - - - - परिवार सहभागी आहे मांडवा येथे रविवारी सकाळी 7 वाजता राख सावडण्याचा कार्यक्रम होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या