💥मराठी पत्रकार परीषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...!


💥मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांनी दिले मुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण💥          

✍️ मोहन चौकेकर

मुंबई  : 19 व 20 नोव्हेंबर रोजी पुणे पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेटून अधिवेशनाच्या उद्घाटनाचे प्रत्यक्ष निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनीही या अधिवेशनात उपस्थिती लावण्याचे शब्द शिष्टमंडळास दिले आहे.

      मंत्रालयात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख  आणि विश्वस्त किरण नाईक यांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठी पत्रकार परीषदेचे 19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे होणाऱ्या 43 व्या  अधिवेशनाचे निमंत्रण त्यांना दिलं.  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपण उद्घाटन उदघाटन समारंभास उपस्थीत  राहण्याचा शब्द दिला.  यावेळी मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, माजी कोषाध्यक्ष  मिलिंद अष्टीवकर, राज्य संघाटक  सुनील वाळुंज हे हि यावेळी उपस्थीत होते.....

✍️ मोहन चौकेकर

 -------------------------------------------------------------------------- मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या