💥सोनिया गांधी यांच्या वाढ दिवसा निमित्त आयोजित केलेल्या व्यक्तिगत कलाकृतीचे भारत जोडॊ यात्रेत चित्र प्रदर्शन....!


💥त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नामवंत चित्रकारांनी सहभाग नोंदवला💥

✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील कला शिक्षक दिलीप दारव्हेकर व  स्वर्गीय राजूभाऊ सातव यांनी डिसेंबर २०२० मध्ये सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्यक्तीचित्र कलाकृतींचे भारत जोडो यात्रेत चित्र प्रदर्शन करण्यात आले आहे 


राजाभाऊ सातव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व कला शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली राज्यस्तरीय व्यक्ती चित्र स्पर्धा अतिशय उत्कृष्ट सहभागाने पूर्ण झाले होती, त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नामवंत चित्रकारांनी सहभाग नोंदवला होता, दोन लाखाच्या बक्षीस वितरणा नंतर या स्पर्धेत सहभागी झालेल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन मुंबई येथे आयोजित करण्याचा मानस राजीव सातव यांचा  होता. परंतु त्यांच्या जाण्याने तो अधुरा राहिला होता.... 

स्पर्धेतील सर्व चित्रकारांची इच्छा होती की या चित्रांचे भव्य प्रदर्शन व्हावे आणि तो योग आज  भारत जोडॊ यात्रेदरम्यान आखाडा बाळापूर येथे आला, मोहम्मद जिद्दी कुरेशी यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन अतिशय देखण्या स्वरूपात साकारण्यात आले होते. रॅली दरम्यान अनेकांनी त्याचे व्हिडिओ घेतले आणि तो एक रॅलीचा आकर्षण बिंदू ठरला. रॅली दरम्यान आमदा डॉक्टर  प्रज्ञाताई सातव यांनी राहुल गांधी यांना चित्र प्रदर्शनी विषयी माहिती दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या