💥भारत जोडॊ यात्राचे सातवांच्या नगरीत जंगी स्वागत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी......!


💥ठाकरे गटाचे पदअधिकारी आज यात्रेतदाखल झाले होते💥


✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडॊ यात्रा सध्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे डोंगरकडा ता .कळमनुरी .येथे हि यात्रा दाखल झाली आहे या यात्रेत युवासेना नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी या भारत जोडॊ यात्रेत सहभागी  झाले आहेत आदित्य ठाकरे पाई चालत राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत होते सध्या राज्यात महाविकास आघाडीत कॉग्रेससोबत मित्रपक्ष आहेत राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याने आज माजी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे हें भारत जोडॊ यात्रेत सहभागी झाले होते.


ठाकरे गटाचे पदअधिकारी आज यात्रेतदाखल झाले होते :- 

राहुल गांधी यांची भारत जोडॊ यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली या यात्रेच्या स्वागतसाठी भव्य महाद्वार देखिल उभारण्यात आले होते व  मापडी पोतराज आदिवासी बांधाव गजरात .शेतकरी मजूर गोंधळी बंजारा बांधाव आणि कॉंग्रेसचे पदअधिकारी मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी झाले होते.

शिवसेना नेते युवासेना प्रमूख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व ठाकरे गटाचे पदअधिकारी या भारत जोडॊ यात्रेत सहभागी झाले होते राहुल गांधी यांची भारत जोडॊ यात्रा सध्या सातवांच्या नगरीत आगमन झाले आहे मात्र त्यांच्या स्वागतासाठी आपला जीगरी दोस्त नसल्याने त्यांच्या साठी हा क्षन भावनिक असणार आहे.


भारत जोडो यात्रेत 'पन्नास खोके एकदम ओक्के'चे नारे :-

भारत जोडॊ यात्रा चोरांबा फाटा येथे पोहचली त्यावेळी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व त्याचे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते ते नागरिकांनासोबत काही वेळ बोलत चालल्यानंतर राहुल गांधी यांच्याशी देखिल चालत चालत चर्चा केली यांच वेळी त्यांच्या काही पदअधिकारी यांनी पन्नास खोके एकदम ओके अश्या घोषणा देत शिंदे गटाला पुन्हां डीवचले आहे

यादरम्यान खा.राहुल गांधी यांच्यासमवेत शिवसेनेचे युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही दिसून आले.शिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. प्रज्ञा सातव, शिवसेनेचे आ. राहुल पाटील आदींसह राज्यातून आलेली काँग्रेसची नेतेमंडळी सहभागी झाली होती.

हिवरा फाटा येथून राहुल गांधी यांनी आपल्या पायांचा वेग वाढविला. रस्त्यात ते काही जणांना जवळ बोलावून बोलताना दिसत होते. शालेय मुले, युवक, डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मंडळीचा यात समावेश होता. रस्त्याने चालत असतानाच ते या मंडळींशी विविध विषयांवर चर्चा करीत होते.दुहेरी कठडे, सीआरएफ व स्थानिक पोलीस अशा दुहेरी सुरक्षा व्यवस्थेत त्यांचा हा ताफा अवघ्या काही वेळातच डोंगरकडा येथे पोहोचला.

हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक नेते माजी खा. सुभाष वानखेडे, संपर्कप्रमुख बबन थोरात, विनायक भिसे,गोपू पाटील, कृष्णराव पाटील, नांदेडचे दत्ता कोकाटे, बालासाहेब देशमुख आदींसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत  ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या