💥राष्ट्र संत गोविंददेव गिरी यांच्या भागवत कथेला उपस्थित राहण्याचे आ.मेघना बोर्डीकर सामोरे यांनी केले आवाहन...!


💥या कथेला तालुक्यातील व बाहेर गावाहून शेकडो भक्त उपस्थित राहतील💥

जिंतूर प्रतिनिधी बि.डी.रामपूरकर

अयोध्या जन्मभूमी श्रीराम मन्दिर न्यास चे कोषाध्यक्ष  राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या 9 ते 15 डिसेंबर दरम्यान जिंतूर शहरात होणाऱ्या कथेला उपस्थीत राहण्यासाठी आवाहन केले आवाहन. 

डिसेंबर 9 ते 15 दरम्यान होणाऱ्या भागवत कथेच्या तयारी बाबत आज आमदार मेघना बोर्डीकर यांनी  स्वतः माहिती घेतली कथेच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली या कथेला तालुक्यातील व बाहेर गावाहून शेकडो भक्त उपस्थित राहतील याचा अंदाज घेऊन आज त्यांनी सर्व व्यवस्था बाबत जिल्हाधिकारी आचल गोयल आणि जिल्हापोलिस अधिक्षक यांची पण भेट घेतली प्रशाकीय स्तरावर सर्व सहकार्य करण्याच्या सूचना दिल्यात योग्य व आवश्यक बंदोबस्त देण्यासाठी पण सूचना दिल्यात.

या कथेला सर्व भक्तांना उपस्थित राहावे व हा कार्यक्रम जिंतूर वासीयांचा आहे असे समजून सर्व क्षेत्रातील नागरिकांनी सहकार्य करावे असेही त्यांनी स्पस्ट केले दरम्यान  कथेची तयारी केळी असून विविध समित्या सह  प्रचार व प्रसार  समिती प्रमुख म्हणून पत्रकार सचिन रायपत्रीवार यांची निवड करण्यात आली या निमित्त सर्व पत्रकारांची बैठक घेण्यात आली या वेळी शहरातील सर्व वर्तमानपत्र प्रतिनिधी व इलेक्ट्रॉनिक मीडिया चे प्रतिनिधी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या