💥वयोवृद्ध पत्रकार हेमंत जोगदेव यांना पुणे जिल्हा पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर....!


💥मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार💥 

✍️ मोहन चौकेकर 

पुणे (दि.११ नोव्हेंबर) : पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने यावर्षी पासून दिला जाणारा भा. वि. कांबळे जीवन गौरव पुरस्कार वयोवृद्ध पत्रकार हेमंत जोगदेव यांना जाहीर करण्यात आला आहे.. पाच हजार रूपये रोख, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली. यावेळी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव नाना कांबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आदि उपस्थित होते.

हेमंत जोगदेव आज ९४ वर्षांचे आहेत. त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणून केसरीमध्ये दीर्घकाळ पत्रकारिता केली. क्रीडा पत्रकारितेला बाप माणूस अशी त्यांची ओळख होती. एक तत्त्वनिष्ठ पत्रकार असलेल्या हेमंत जोगदेव यांनी क्रीडा क्षेत्रावर दहा पेक्षा जास्त  पुस्तकं लिहिली. ऑलेम्पिया येथे भेट देऊन आल्यानंतर त्यांनी "ऑलेमपिक्सच्या उगमाशी" हे पुस्तक लिहिले.. क्रीडा पत्रकारिता हे त्यांचे पुस्तक देखील नव्या पिढीतील क्रीडा पत्रकारिता करणारया पत्रकारांसाठी मार्गदर्शक आहे.

आजही त्यांचं लेखन सुरू असते.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी दूरध्वनीवरून हेमंत जोगदेव यांचे अभिनंदन केले आहे......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या