💥परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रात राजमा पिक परिसंवाद कार्यक्रम संपन्न....!


💥या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पि.बी.बनसावडे प्रकल्प उपसंचालक, आत्मा, परभणी यांची प्रमुख उपस्थिती💥

परभणी : हवामान अनुकुल तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर राबविणे आवश्यक असल्याने मराठवाड्यातील रब्बी हंगामातील पिक पध्दतीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथे दि. ०८/ रोजी राजमा लागवड तंत्रज्ञान व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  पि. बी. बनसावडे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, परभणी,  कृषि भुषण   प्रगतशिल शेतकरी . सुर्यकांतराव देशमुख,   अध्यक्ष म्हणुन डॉ. प्रशांत भोसले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, परभणी हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन राजमा पिकासाठी भौगोलीक मानांकन मिळविणारे सातारा येथील प्रगतशिल शेतकरी  मधुकर कदम, उपविभागीय कृषि अधिकारी, अंबाजोगाई  शिवप्रसाद येळकर, कृषि विज्ञान केंद्र, हिंगोली येथील शास्त्रज्ञ प्रा. अनिल ओळंबे हे उपस्थित होते.

डॉ. प्रशांत भोसले यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये राजमा पिकाच्या लागवडीची गरज, परभणी जिल्ह्यातील सद्य पिक परिस्थिती, पारंपारीक पिक पध्दतीमध्ये येणाऱ्या अडचणी, माती परिक्षणाचे महत्व, मृदेची सुपिकता टिकविण्याच्या दृष्टीने पिकांच्या फेरपालटीची गरज व हवामान अनुकुल तंत्रज्ञान वापरुन आपण शेतीतील उत्पन्न कशाप्रकारे वाढवु शकतो याबाबत मत व्यक्त केले.

. पि. बी. बनसावडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये राजमा पिकाच्या प्रात्यक्षिकांसाठी कृषि व आत्मा विभागामार्फत तालुका निहाय कार्यक्रम घेण्याचे प्रस्तावित केले तसेच राजमा हे पिक नवीन व रब्बी हंगामातील पर्यायी पिक असुन त्याचे प्रभावी माध्यमातुन नियोजन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका निहाय शेतीशाळा राबविण्याबाबत विचार सुरु असल्याचे नमुद केले.   सुर्यकांत देशमुख यांनी पिक बदल हा एकात्मिक शेती पध्दतीचा गाभा असुन शेतकऱ्यांनी एकाच पिक पध्दतीवर अवलंबुन न राहता बहुविध पिक पध्दतीचा अवलंब करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये  मधुकराव कदम यांनी राजमा पिकाचा इतिहास, लागवड तंत्रज्ञान, त्याच्या विविध वाणांची माहिती तसेच भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कशाप्रकारे फायदा होतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियाण्यांबाबत शेतकऱ्यांना माहिती सांगुन ते बियाणे कशाप्रकारे उपलब्ध करता येईल याची उपस्थितांना हमी दिली. . शिवप्रसाद येळकर यांनी एकात्मिक पिक व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करुन राजमा पिकातील किड व रोग व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, पिक उत्पादन वाढीसाठी जैविक निविष्ठांचा वापर, उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्न वाढविण्या बाबतच्या तंत्रज्ञान शिफारशी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रा. अनिल ओळंबे यांनी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार राजमा पिक लागवडीमध्ये कशाप्रकारे बदल करावेत याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत राजमा उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी मार्केट उपलब्ध असेल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी नामदेव कोकर 8 एकर राजमा पीक लागवड केली असे सांगितले पडीत थोरात प्रकाश हरकळ शीळवने सर रमेश राउत जनार्धन आवरगंड शुरेश शृंगार पुतळे आधी शेतकरी भरपूर प्रमाणात उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. श्रीधर पवार व आभार प्रदर्शन प्रा. अमित तुपे यांनी केले. या कार्यक्रमासाठी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या जिल्ह्यातील 200 शेतकरी व शेतकरी महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र व उत्तम कापुस निर्मिती प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले......




  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या