💥राज्य शासनाच्या स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या निर्णयाचे प्रहार जनशक्ती पक्षा कडून जल्लोष करून स्वागत.....!


💥फटाके व पेढे वाटून केले दिव्यांगांचा सत्कार💥

मा.आ.बच्चूभाऊ कडू यांच्या लढाई ला यश आले असून मागील २५ वर्षांपासून दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी मा.आ.बच्चूभाऊ कडू यांचा लढा चालू आहे. राज्यात दिव्यांगांचे एक स्वतंत्र मंत्रालय असावे या मागणीला यश आले असून राज्य शासनाने राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मंजूर केले आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य ठरले आहे.

मा.आ. बच्चूभाऊ कडू यांनी सत्यत्याने  लाउन धरलेला स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयास राज्य शासनाची मान्यता मिळाली या यशाचा जल्लोष आज प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी प्रदीप गाधारे, गजानन दुधारे, विशाल बनसोडे, शेख गौस, महेश कोलपेकवार, शैलेश नवघरे, दत्तराव रोंदळे या दिव्यांग बांधवांचा सत्कार करून त्यांना पेढे भरविण्यात आले.

या जल्लोषात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके पाटील, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, महिला आघाडी शहर चिटणीस ऍड. सुवर्णाताइ देशमुख, महिला आघाडी उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे,   रामेश्वर जाधव, उद्धव गरुड, गजानन मुळे, शेख बशीर, सय्यद युनूस, जयश्रीताई पारवे, मिनाताई जाधव, गोदावरीताई दिपके, कमलताई दिपके,  मंगलताई जाधव, सय्यद रफिक, सुरेश काळे, नवनाथ काळे, कैलाश जमदाडे, भास्कर बोबडे, मुंजा चव्हाण आदींनी सहभाग नोंदविला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या