💥परळी वैजनाथ तालुक्यातीलहेळंब येथे खंडोबा मंदिरात तीन दिवसीय यात्रोत्सव आजपासून प्रारंभ....!


💥पालखी सोहळा,वाघ्या मुरळी,कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रम💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रेस मंगळवारी प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने रविवारपासून मंदिर परिसर दुमदुमू लागला आहे. 

     हेळंब येथे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे.  या निमित्त मंगळवारी दुपारी १ वा. श्री खंडोबाची पालखी मिरवणुक निघणार आहे. रात्री १२ वाजता शोभेची दारु उडवून अतिषबाजी केली जाणार आहे व २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. बुधवारी रात्री ८ ते १२ दरम्यान वाग्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी , दि.1 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,००१/- ठेवण्यात आले आहे.

     हेळंब येथे जागृत असे श्री.खंडोबाचे मंदिर आहे. चंपाषष्ठी निमित्त हेळंब येथे मंगळवार पासुन तीन दिवशीय यात्रेस प्रारंभ होत आहे. यात्रेची तयारी जय्यत करण्यात आली आहे. विविध खेळणी साहित्याचे दुकाने गावात थाटण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातुन खंडोबाच्या दर्शनासाठी हेळंब मध्ये पन्नास हजारोंच्यावर भाविक दाखल होणार आहेत.हेळंब येथील श्री खंडोबा मंदिर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी यात्रेला असंख्य भाविक भक्त दर्शन येतात. हेळंब गावापासून श्री खंडोबाचे अतिशय पुरातन मंदिर आहे भव्य दीपमाळ लक्ष वेधून घेते चंपाषष्ठी निमित्त दरवर्षी तीन दिवसीय यात्रा भरते यात्रेत राहट पाळणे विविध प्रकारचे अन्नपदार्थांची दुकाने साहित्याची दुकाने लावली जातात यात्रेला भाविक हजेरी लावतात.

    नवस केला की पावतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे भाविक नवस बोलतात फळ मिळाल्यास ते नवस पूर्ण करतात. यासाठी पंचक्रोशीतील व ग्रामस्थ कितीही बाहेर असले तरी यात्रेनिमित्त ते दर्शनासाठी आवर्जून येतात. मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद आणि अनेक राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.  खंडोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे. चंपाषष्ठीला  तीन दिवशीय यात्रा भरते, मंगळवारी हेळंब येथील श्री हनुमान मंदिरापासुन श्री खंडेरायाच्या मुर्तीची मिरवणुक वाजत गाजत निघते, एक किलोमिटर अंतरावर असलेल्या खंडोबा मंदिरात ही पालखी येते, पुन्हा ही पालखी गावातुन जाते. या पालखी सोहळ्यात हेळंब व परिसरातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात. बुधवारी सायंकाळी हेळंब येथे वाघ्या मुरळ्याचा कार्यक्रम घेण्यात येतो व गुरुवारी कुस्त्याच्या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. तीन दिवशीय यात्रेत परळी तालुक्यातील राज्यातील अनेक ठिकाणाहुन भक्त सहभागी होतात व खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतात. या यात्रेची ग्रामस्थांनी जोरदार तयारी पूर्ण केली आहे.  तीन दिवसीय यात्रेत दर्शनासाठी परळी व परिसरातील ग्रामीण भागातुन भक्त मोठ्या प्रमाणात येतात. हेळंबच्या गावकरी मंडळाच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या यात्रा उत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

@@@@@@@@@@@@@

श्री खंडोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम :+

श्री खंडोबा मंदिर हे भव्य दिव्य आहे. खंडोबा मंदिरात प्राचीन काळापासून यात्रा भरते. मंदिरात लक्षवेधी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रेची ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे. चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी नागदिव्ये घेऊन भाविक खंडोबा मंदिरात व देवासमोर नागदेवे पाजळून मानाचे पाच व ताट भर दिपोत्सव साजरा करतात.  सर्व मंदिर दिपत्सोवाने उज्जवलुन खंडोबाची आराधना करतात.दिवसभर मंदिर परिसरात गावातील व परिसरातील भाविक  तळीभांडार उचलणे, ओटी भरणे, भंडारा खोबरे उधळणं आदि कार्यक्रमास सुरुवात करतात व रात्री १० वाजता श्रींचा अश्वरूपी मूर्तीसह सवाद्य छबिना मिरवणूक काढून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते. यावेळी हलगीच्या तालावर खंडोबाचे वारू शिव मल्हार येळकोट. येळकोट घे च्या जय जयकारात बेभान होऊन  नाचतात हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

घरोघरी तळी भंडारा :- 

भाविक आपल्या घरी चंपाषष्ठी दिवशी. देवाच्या ताब्यांचे कोंटुबाची पुजा करून. वाग्यांचे भरीत, बाजरीची रोडगे, काद्यांची पात इत्यादी पदार्थांचा भरीताचा व नैवेद्य ठेऊन पाच वेळा सदानंदाचा येळकोट येळकोट जय चा गजर करून. तळी भंडारा कार्यक्रम होतो व नवीन वागीं व कांदा खाणास प्रारंभ होतो.

खंडेरायाला खोबर व भंडाऱ्याची उधळण :-

 खंडोबाला चंपाषष्टी दिवशी तालुक्यातील सर्व भाविक खंडोबा मंदीरात येऊन. सदानंदाचा येळकोट येळकाेट जय मल्हार चा गजरात खोबर भंडाराची उधळण होते. खोबर व भंडारा मंदिरावर उधलेला भक्तजन प्रसाद म्हणून घेतात. व आपल्या कपाळावर भंडारा लावतात. अशी माहिती भाविक ग्रामस्थांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या