💥परभणी येथे बाल महोत्सवाचे आयोजन.....!


💥या बाल महोत्सवाचे उद्घाटन लोक प्रतिनिधी,जिल्हाधिकारी महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त यांच्या हस्ते💥

परभणी (दि.30 नोव्हेंबर) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत बालगृहातील प्रवेशित व जिल्ह्यातील शाळेतील बालके/विद्यार्थ्यांसाठी दिनांक 1 ते 3 डिसेंबर, 2022 या कालावधीत क्रिडा स्पर्धा/बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त यांच्या हस्ते होणार आहे.

या बाल महोत्सवामध्ये दि. 1 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 9.45 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत मैदानी खेळ खो-खो, कब्बडी, लांब उडी, रिले, धावणे, गोळा फेक, थाळीफेक आदी स्पर्धा प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रिडा संकुल, परभणी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. तर दि. 2 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 9.45 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रिडा संकुल, परभणी  येथे इन डोअर स्पर्धा कॅरम, बुध्दीबळ, चित्रकला, लांब, वकृत्व, निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच दि. 3 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 9.45 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत समुह गायन, एकल गायन, समुह नृत्य, एकल नृत्य, एकाकिंका, नाटक या सांस्कृतीक स्पर्धांचे येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठी संपर्क (7875251575) स्थळ - जिल्हा क्रिडा संकुल, परभणी येथे संपर्क करावा. या स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय बालक / विद्यार्थ्याना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या