💥पुर्णा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवेदनाची नगरपालिका प्रशासनाने घेतली दखल....!


💥नगर पालिका प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेचे थकीत आर्थीक अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले💥

पुर्णा (दि.१५ नोव्हेंबर) - प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत  थकीत आर्थीक अनुदान देण्यात यावे.अन्यथा १६.११.२०२२ रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा दिल्या नंतर आज मंगळवार दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी नगर पालिका प्रशासनाने थकीत आर्थीक अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले.राहीलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात येईल असे आश्वासन दिले. प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवेदनाची दखल घेतल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रताप भैय्या कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष बाबा पठाण, मा.नगरसेवक अमजद भाई नुरी,मा.नगरसेवक विरेश कसबे,बाळु जोगदंड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाचा सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या