💥.....तर अमरिंदरसिंघ यांच्या नावाचा विचार व्हावा....!


💥महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदरसिंघ यांच्या नावाचा विकल्प💥

नांदेड (दि.28 नोव्हेंबर) - महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम मा. भगतसिंह कोशियारी यांना बदलण्याच्या हालचालीं वेग आले आहे अशा बातम्या सुरु आहेत. टीवी चैनल्सवर अशा बातम्या येत आहेत. केंद्र शासनाने जर राज्यपाल मा. भगतसिंह कोशियारी यांना बदलण्याचा निर्णय घेतला असल्यास पंजाबचे माजी मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदरसिंघ यांच्या नावाचा विकल्प उपलब्ध आहे. 

त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नेमणूक करावी अशी मागणी पत्रकार स. रविंद्रसिंघ मोदी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या आधारे केली आहे. पत्रकात पुढे म्हंटलं आहे की सोमवारी अचानकपणे मराठी टीवी चैनल्सवर राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या विषयी बातम्या सुरु झाले आहे. नुकतीच राज्यपाल श्री कोशियारी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीची वारी केली होती. त्यानंतर अशा बातम्या सुरु झाल्या आहेत. तेव्हा अनुभवी असलेले नेते कैप्टन अमरिंदरसिंह यांच्या नावाचा एक विकल्प केंद्र शासनासमोर उपलब्ध आहे. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कैप्टन अमरिंदरसिंघ यांनी दीर्घकाळ कार्य केलेले आहे. त्यांना राजकीय परिस्थितीची चांगलीच जाणीव आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी ते चांगले विकल्प ठरू शकतात. वरील विषयी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा अशी मागणी रविंद्रसिंघ मोदी यांनी प्रस्तुत केली आहे.....

रविंद्रसिंघ मोदी. 

मो.9420654574

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या