💥सोनपेठ येथे श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पट्टाभीषेक बावीसावा वर्धापन दिन संपन्न...!


💥पट्टाभीषेक बावीसावा वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा विरशैव रत्न पुरस्कारांचे वितरण💥

सोनपेठ (दि.२२ नोव्हेंबर) :- श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पट्टाभीषेक बावीसावा वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा विरशैव रत्न पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात उपस्थित गुरुवर्य गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज,गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज,गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज,गुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज,गुरु चनबसव शिवाचार्य महाराज,देवदुत ओमप्रकाश शेटे,दत्ताप्पा ईटके (गुरुजी) व विरशैव रत्न पुरस्कारांचे मानकरी यांच्या हस्ते प्रथम दिपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली,सर्व गुरुवर्यांचे स्वागत सप्ताह कमिटी च्या वतीने करण्यात आले,स्वागत गीताने स्वागत करण्यात आले,उपस्थित पत्रकार बांधवांचे गुरुवर्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांची पादपुजा,सर्व गुरुवर्यांच्या वतीने गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज यांनी श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे स्वागत केले,विरशैव समाज बांधव लातुरकर, परभणीकर,अंबाजोगाईकर,कळंबकर,परळीकर,डॉ.ओमप्रकाश शेटे व शिल्पाताई शेटे, श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ सोनपेठ आदिंच्या च्या वतीने श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचा सत्कार करण्यात आला.प्रास्तावीक उमेश आप्पा नित्रुडकर यांनी केले.विरशैव रत्न पुरस्कारांचे मानकरी यांचा परीचय शिवानंद गुळवे गुरुजी यांनी दिला,विरशैव रत्न पुरस्कारांचे गुरुवर्यांच्या हस्ते सर्व श्रीमान डॉ.ओमप्रकाशजी शेटे,सोमनाथअप्पा हालगे,दत्ताप्पा ईटके (गुरूजी),प्रा.किरण सोनटक्के,चित्रसेनजी गुळवे,सोमनाथअप्पा साकरे,विजयकुमार मेनकुदळे,रामदास पाटील सुमठाणकर,परमेश्वर लांडगे,मन्मथअप्पा पंचाक्षरी,सुरेशअप्पा दोशेट्टी,दिलपअप्पा वसमतकर,बसवंतअप्पा भरडे,उमेशअप्पा पोखरकर,डॉ.निशांत पाचेगावकर, सुरेशअप्पा चौधर,विजयकुमार चलवदे,अरूण वडगावे,अशोकअप्पा सावरगावकर,उमाकांतअप्पा कोरे,देवलिंग देवडे,विश्वनाथअप्पा कुंभार आदिं २२ जनांचा सत्कार करण्यात आला.मनोगत ओमप्रकाश शेटे,दत्ताप्पा ईटके (गुरुजी), उमाकांत कोरे,देवलींग देवडे तर आशिर्वचन गुरु चनबसव शिवाचार्य महाराज,गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज,समारोप गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या आशिर्वचनाने करण्यात आला.सुत्रसंचलन व आभार शिवानंद गुळवे गुरुजी यांनी केले.यांचाही सत्कार गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी केला.आरती व महाप्रसादाने सांगता करण्यात आली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या