💥परभणीत शिवसेने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यपाल कोश्यारींचा तिव्र शब्दात निषेध...!


💥शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस 'जोडे मारून' आंदोलन💥

परभणी (दि.२१ नोव्हेंबर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारून शिवसैनिकांनी आज सोमवार दि.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीव्र संताप व्यक्त केला.

       महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात 'शिवाजी महाराज हे तर आता जुने पुराणे आदर्श झाले', असे अवमानकारक विधान केले. तर  भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र पाठवून औरंगजेबाची माफी मागितली होती', असे विखारी उद्गार काढले. यामुळे या दोघांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर संतप्त भावना व्यक्त होत असून ठीकठिकाणी त्यांच्या प्रतिमेस 'जोडे मारो' आंदोलन करून या दोघांचाही तीव्र निषेध नोंदविला जात आहे. 

        दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी  यांच्या प्रतिमेस जोडे मारून  आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम   यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. 

    शिवसैनिकांनी   राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा जाहीर निषेध नोंदवून राज्यपाल कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे, अशी  मागणी करण्यात आली. शिवसैनिकांनी राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. 

      या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद  आनेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक संजय सारणीकर, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी अर्जुन सामाले, दीपक बाराहाते, परभणीचे तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, परभणी ग्रामीणचे तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले, पुर्णेचे तालुकाप्रमुख काशीनाथ काळबांडे, अतुल सरोदे, विशू डहाळे, संभानाथ काळे, अरविंद देशमुख, गंगाखेडचे शहरप्रमुख जितेश गोरे, जानकीराम पवार, रावसाहेब रेंगे, संदीप देशमुख, रामप्रसाद रणेर,  विलास अवकाळे, मारुती तिथे, राहुल खटिंग, व्यंकट वाघ यांच्यासह अन्य शिवसैनिक सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या