💥पुर्णेत दि.११ नोव्हेंबर रोजी डॉ.संदीप जोंधळे व डॉ.स्नेहल जोंधळे यांच्या नवजीवन हॉस्पिटलचा भव्य लोकार्पण सोहळा....!


💥लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रय वाघमारे यांची राहणार प्रमुख उपस्थिती💥


पुर्णा (दि.०७ नोव्हेंबर) - पुर्णा शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य रुग्नांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणारे आरोग्यतज्ञ डॉ.संदीप मारोपीराव जोंधळे व डॉ.सौ.स्नेहलताई संदीप जोंधळे यांच्या नवजीवन हॉस्पिटल व हॉस्पिटलच्या नुतन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो आशिर्वादाने व त्याच्या सन्माननीय आई उपा.लक्ष्मीबाई मारोतीराव जोंधळे व सन्माननीय वडील उपा.मारोतीराव संभाजीराव जोंधळे यांच्या शुभहस्ते येथील गवळी गल्ली परिसरातील कमाल टॉकीज जवळ शुक्रवार दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास संपन्न होणार आहे.

नवजीवन हॉस्पिटल व हॉस्पिटलच्या नुतन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक तथा जेष्ठ आरोग्यतज्ञ सन्माननीय डॉ.दत्तात्रय वाघमारे हे राहणार असून या भव्य शुभारंभ सोहळ्यास सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ.प्रकाश डाके परभणी,मराठवाडा बाल रुग्नालयाचे प्रमुख तथा जेष्ठ बालरोगतज्ञ डॉ.संग्राम जोंधळे नांदेड,राजश्री शाहू हॉस्पिटलचे प्रमुख तथा जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ.सिध्दार्थ भालेराव गंगाखेड,फिनिक्स हॉस्पिटलचे प्रमुख तथा जनरल फिजिशीयन व हृदयरोगतज्ञ डॉ.अनंत सुर्यवंशी नांदेड, अपेक्षा हॉस्पिटल नांदेड येथील जनरल सर्जन डॉ.दिलीप फुगारे,धबाले हॉस्पिटल नांदेडचे अस्थिरोगतज्ञ डॉ.अशोक धबाले,अंबोली हॉस्पिटल नांदेडचे जनरल फिजिशीयन व हृदयरोगतज्ञ डॉ.अनिल कांबळे,परभणी येथील पोटविकारतज्ञ डॉ.परमेश्वर साळवे,जोशी हॉस्पिटल नांदेडचे मनोविकारतज्ञ डॉ.दि.बा.जोशी,ग्लोबल हॉस्पिटल नांदेडचे मेंदूविकारतज्ञ डॉ.विद्याधर भेदे,गॅलेक्सी हॉस्पिटल नांदेडचे पोटविकारतज्ञ डॉ.नितीन जोशी,अपेक्षा हॉस्पिटलचे जनरल फिजिशीयन तथा हृदयरोगतज्ञ डॉ.अर्जुन शेळके,लाईफ केअर हॉस्पिटल नांदेडचे किडनी विकारतज्ञ डॉ.डॉ.संतोष दुरुगकर,पुर्णेतील जनरल फिजिशीयन व हृदयरोगतज्ञ डॉ.विनय दत्तात्रयजी वाघमारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून डॉ.संदीप जोंधळे (बिएएमएस एमडी) व डॉ.स्नेहलताई जोंधळे (बिएएमएस) यांच्या 'नवजिवन हॉस्पिटल'ला डॉ.विनय विजय बगाटे (एमबीबीएस.डि.ऑर्थो,अस्थिरोगतज्ञ),डॉ.दत्तात्रय इंदूरकर (एमबीबीएस.पिजीडीडीएस,फिजिशीयन व मधुमेहतज्ञ),डॉ.प्रल्हाद राठोड (एमडी स्किन व व्डिडी,त्वचारोगतज्ञ,केईएम हॉस्पिटल मुंबई),डॉ.नंदकिशोर सारंग (एमबीबीएस.डिएनबी 'मेडीसीन' जनरल फिजिशीयन या तज्ञ डॉक्टरांची व्हिजीट राहणार असून नवजिवन हॉस्पिटलमध्ये रुग्नांना एक्स रे,इ.सी.जी,ऑक्सिजन,पेथॉलॉजी लेब आदी महत्वाच्या सुविधा उपलब्ध होणार असून या 'नवजिवन हॉस्पिटलच्या' भव्य शुभारंभ सोहळ्यास तमाम पुर्णेकर मान्यवरांनी  उपस्थित राहावे अशी विनंती नवजिवन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संदीप जोंधळे (बिएएमएस एमडी) व डॉ.स्नेहलताई जोंधळे (बिएएमएस) यांनी केली आहे.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या