💥परभणी जिल्ह्यातील जल जीवनची कामे गुणवत्तापूर्ण करा - सीईओ रश्मी खांडेकर


💥यावेळी आढावा बैठकीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार यांची उपस्थिती💥

परभणी :- (दि.12 नोव्हेंबर) - जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे सद्यस्थितीत जिल्ह्यात सुरू आहेत. सदरची कामे गुणवत्तापूर्वक आणि जलद गतीने होतील व त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागातील सर्व अभियंते, विभागीय कार्यालयातील अभियंते, सर्व उपाभियंते यांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा परिषदेत करण्यात आले होते. यावेळी आढावा बैठकीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार यांची उपस्थिती होती.

उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देताना रश्मी खांडेकर म्हणाल्या की, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळ जोडणी देणे आवश्यक आहे प्रत्येक घराला नळ जोडणी झाली आहे का याची संबंधित ग्रामसेवकांनी खात्री करावी. नळ जोडणी झालेल्या कुटुंबाच्या नोंदी शासनाच्या संकेतस्थळावर तातडीने करण्याच्या सूचना खांडेकर यांनी यावेळी दिल्या त्याच बरोबर विहिरीची जागा, जलकुंभाची जागा, पाणी शुध्दीकरण केन्द्र ला देण्यात येणारी जागा इत्यादी जमीन ग्रामपंचायतीच्या नावे लावण्या बाबत देखील रश्मी खांडेकर यांनी सुचवले.

*जलजीवन मिशन कार्यक्रमाची सद्यस्थिती*

 एकुण ग्रामपंचायत - 704

- एकुण गावे - 827

- एकुण वाड्या - 1080

- रेट्रोफिटींग/नवीन योजना - 690

- भुजल सर्वेक्षण पुर्ण - 690

अंदाजत्रक तयार - 690 = 100%

- तांत्रिक मान्यता झालेली गावांची संख्या - 686 = 99.42 %

- प्रशासकीय मान्यता झालेल्या गावांची संख्या - 682 = 98.64%

- निविदा प्रक्रिया झालेला गावांची संख्या - 671= 97.24%

- कार्यारंभ आदेश निर्गमीत - 565=81.88  %

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या