💥पोलिस भरती करणाऱ्या विध्यार्थीना एका घटकासाठी अनेक अर्ज करता यावे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन.....!


💥विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा येऊ नये यासाठी शासनाने एका घटकासाठी अनेक अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना द्यावी💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील विध्यार्थी यांनी आज हिंगोली जिल्हाअधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे की, सन 2020-21 मध्ये होणारी पोलीस भरती यामध्ये शासनाने जी एका घटकात एकच अर्ज भरण्याची अट ठेवण्यात आलेली आहे ती आठ विद्यार्थ्यांच्या भविष्यावर शंकेचं कारण आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच पदासाठी जास्तीत जास्त अर्ज करता येतील अशी सुधारणा करावी अशी  विद्यार्थ्यांना निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी केली आहे शासनाकडून अपेक्षा आहे विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा येऊ नये यासाठी शासनाने एका घटना साठी अनेक अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना द्यावी व त्याबाबत लवकरात लवकर  प्रशासनाच्या वतीने नवीन जीआर प्रसिद्ध करावा व शासनाने लवकरात लवकर योग्य ते निर्णय द्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या