💥वन्य प्राण्यांचा हैदोस शेती पिकांचे मोठे नुकसान सेनगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त....!


💥वन विभागाने वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे💥

 शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवताना शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. त्याचवेळी अतोनात खर्च करून कष्टाने जगविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत.सेनगाव  तालुक्यातील हत्ता नाईक शिवारातील मामताजी हिमगिरे यांच्या शेतातील कापुस पिकाची रानडुकरांनी नासाडी केली.


मामताजी हिमगिरे यांचे कापूस पीक सध्या जोमात असून रात्री, अपरात्री रानडुकरांनी संपूर्ण शिवारात हैदोस घातला आहे. हत्त.नाईक साखरा .हिवरखेडा .केलसुला खडकी धोतरा वोरखेडी कापडशिंगि  शिवारात डोंगरमाथ्याच्या शेजारी व परिसरात रानडुकरांसह निलगाई कोल्हे  व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकुळ सुरू आहे सध्या तालुक्यातील सर्वच शेतकरी यांनी हरभरा पिकांची पेरणी केली आहे त्यामुळे . बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहे. मात्र, वन्यप्राणी नासाडी करतात त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी. संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील डोंगराळ भागात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा फटका बसत आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सेनगाव: तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांपासून प्रचंड प्रमाणात रानडुकरांसह नील गाईंच्या प्रचंड त्रास होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र याकडे वनविभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले. तालुक्यातील वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी वैतागून गेले आहे.वन विभागाने या संबंधी उपाययोजना करण्याची गरज असताना दुर्लक्ष करीत आहे.त्या मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे .विशेष म्हणजे या साठी अमलात असलेल्या योजनांची तालुक्यात अमलबजावणी होत नाही. राज्य शासनाने सध्या राबविण्यात येत असलेल्या डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत वनक्षेत्राच्या सीमेपासून जवळ असणाऱ्या गावांमधील शेतीसाठी शेत पिकांचे वन्य प्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लोखंडी जाळीचे कुंपण हे 90% अनुदानावर दिल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे याकरिता राज्य शासनाने जिंतूर व सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी काठच्या गावामधील शेती साठी तार कुंपण योजना अनुदान तत्वावर राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे सध्या राज्य सरकार वन विभागाच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पाच्या बफरक्षेत्रात तसेच अभयारण्य राष्ट्रीय उद्याने यांच्या सीमेपासून अंतर पाच किलोमीटर यामध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करत आहे यात अत्यल्प भूधारक अशा प्रकारे प्राधान्य देण्यात येते हीच योजना पूर्णा नदी काठच्या गावात राबविणे आवश्यक आहे सध्या येलदरी धरणाच्या खलील भागात मोठ्या प्रमाणात रान डुक्कर, निल गाय, यासह विविध वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत आहेत रात्रीच्या वेळी हे प्राणी शेतात धुडगूस घालतात आणि दिवसा नदी काठच्या दाट जंगलात लपून बसतात त्यामुळे शेतकरी असह्य झाले असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पिकांचे वन्य प्राणी नुकसान करत असल्यामुळे शेतकरी शेती व्यवसायास कंटाळले आहेत याकडे शासनाने लक्ष घालून नदी तलाव आदींच्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर तारेचे कुंपण करण्यासाठी आर्थिक मदत केल्यास वन्य प्राणी आणि शेतकरी यांच्यातील मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेला संघर्षं कमी होईल तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शेत व्यवसाय करण्यास चांगला वाव मिळेल याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वनविभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज रवींद्र गडदे. 

********************************************

प्रतिक्रिया :-

वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी वैतागून - रवींद्र गडदे

सेनगाव तालुक्यातील सर्व भागात वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी वैतागून गेले आहे.त्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.या संबधी सातत्याने आम्ही आंदोलन करीत आहोत.परंतु वनविभाग लक्ष देत नाही.अशी तक्रार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या