💥पूर्णेतील रेल्वे उड्डाणपूलाच्या कासवगतीने होणाऱ्या बांधकामामुळे पुर्णेकर त्रस्त....!


💥रेल्वे उड्डाणपूलाच्या प्रश्नावर व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात : व्यापारी करणार रास्ता रोको आंदोलन💥


पूर्णा : पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील रेल्वे लोहमार्ग नांदेड-हिंगोली गेटावर तब्बल ९६ कोटी ६६ लाख ३५ हजार ७५७ रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून तयार करण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे कामास २७ आगस्ट २०१९ रोजी जिल्ह्याचे खा.संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते कामाचे उदघाटन करून सुरुवात करण्यात आली सदरील कामाचा कालावधी ३६० दिवसांचा असतांना या कामास आज पावेतो ३ वर्षे ३ महिने अर्थात ३९ महिन्यांचा कालावधी म्हणजेच ११७० दिवसांचा कालावधी होत असतांना देखील या रेल्वे उड्डान पुलाचे काम ५०% देखील पुर्ण झाले नसल्यामुळे अत्यंत संथगतीने होत असलेल्या या रेल्वे उड्डान पुलाच्या कामामुळे वाहन धारक/वाहन चालकांसह नागरिक देखील अक्षरशः त्रस्त झाले असून या रेल्वे उड्डान पुलाच्या जवळील रस्त्याचे देखील काम करण्यात येत नसल्यामुळे व नुतन बांधकामासह आसपासच्या मार्गावर देखील संबंधित गुत्तेदार पाण्याचा वापर करीत नसल्यामुळे  या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापारी संघटनांनी देखील अनेक वेळा अर्जाद्वारे विनंत्या करूनही विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्यामुळे पूर्णेतील सर्व थरातील मंडळी अक्षरशः त्रस्त झाल्याचे दिसत असून यावर शेवटचा उपाय म्हणून लवकरच तालुक्यातील आडत व्यापारी,मेडिकल असोसिएशन,वकील संघ,किराणा व्यापारी आणि समस्त पुर्णेकर नागरिक तिव्र रास्ता रोको करणार आहेत या विषयी तहसीलदार पूर्णा यांना या सर्व मंडळींनी एक निवेदन देत रास्ता रोको वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन यासाठी जवाबदार असेल असे प्रशासनाला ठणकावले आहे.


दरम्यान निवेदनावर आडत व्यापारी अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदाणी, उपाध्यक्ष नागनाथ भालेराव सचिव माऊली कदम ,बळीराम काळबांडे,सुदर्शन कदम,दिनेश कदम,सचिन ठेंगे,अविनाश नवघरे,चांडोजी मामा,राजेश धुत,जब्बार थारा,दिलीप भालेराव बोबडे,लक्ष्मणराव बोबडे,गोविंद मोरे,अनिल कदम, अडवोकेट भारती, लोखंडे सर,डॉक्टर इंगोले,डॉक्टर अजय ठाकूर निवेदन मुख्य निवेदक विशाल चितलांगे यांच्या सहीने देण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या