💥महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते कमानीचे लोकार्पण....!


💥या लोकार्पन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री.बळीरामजी भोसले यांची प्रामुख्याने उपस्थित💥 


पुर्णा : तालुक्यातील सुहागन येथील जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. रामराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुहागन शाळेच्या कमानीचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी  श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले, मा. खासदार  यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. बळीरामजी भोसले उपस्थित होते. तर श्री माधव देवसरकर, स्वा.सं.ब्रि. व श्री हिराजी भोसले, अध्यक्ष छत्रपती संभाजी विद्यालय यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री करण गायकर व श्री साहेबराव कल्याणकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जि.प शाळेचे सर्वं शिक्षक, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोहर कल्याणकर व शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. नेहमीच आचाराला विचारांची आणि विचाराला कृतीची जोड देणारे जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. रामराजे भोसले  यांनी या कामासाठी गावातील सर्व जेष्ठ नागरिक, जि.प. शाळेचे शिक्षक  व तरूणांचे सहकार्य लाभले असे मत व्यक्त केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या