💥पुर्णाई गूळ उद्योगाने अनेकांना मिळतोय रोजगार : थिटे बंधूची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल.....!


💥शेतकरी थिटे यांनी पारंपरिक पीक पद्धतीला बगल देत नैसर्गिक शेती करीत ऊस लागवड करून गुळाचा लघु कारखाना सुरू केला💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली

निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची नेहमीच होरपळ झाली आहे. काळानुरूप शेतातील पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे, जिंतूर तालुक्यातील खरदडी येथील प्रगतशील शेतकरी शंकर थिटे यांनी यावर्षी पारंपरिक पीक पद्धतीला बगल देत नैसर्गिक शेती करीत ऊस लागवड करून गुळाचा लघु कारखाना सुरू केला आहे.


परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील खरदडी येथील शेतकरी शंकर थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पूर्णाई गूळ उद्योग उभारला त्यामुळे परिसरातील शेकडो मजुरांना रोजगार मिळाला आहे जिंतूर तालुक्यातील खरदडी हें गाव डोंगराळ भागात पूर्णा नदीच्या खोऱ्यात हें गाव आहे येथील शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे येथील शेतकरी दत्तराव थिटे यांना 18एकर शेती आहे त्यावर त्यांच्या दहा बारा मानसासह मुला बाळाचे शिक्षन कर्तव्य व शेतीच खर्च अवलंबून आहे त्यामुळे त्याची परिस्थिती नाजूक होती यातूनहि त्यांनी तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले वडिलांच्या कष्टाचे मुलांनी देखिल चीज केले व आत्ता त्याची दोन मुले शंकर थिटे व बालाजी थिटे हें पोलिसदलात कार्यरत आहेत व एक मुलगा भारत वडीला सोबत शेती करतो व त्याची दोन मुले शंकर व बालाजी शहरात राहत असले तरी ते परिस्थितीची जान असल्यामुळे आपल्या भागातील शेतकरी बेरोजगार आहेत तरुणांसाठी काहीतरी करावे या विचारात असतांना या भागात चांगली जमीन पाणी असून सुध्दा ऊस कारखान्याला जात नव्हता .त्यामुळे गावातील या भागातील शेतकऱ्यांना ऊस शेती करता यावी म्हनून गूळ उद्योग करण्याचे ठरवले गेल्या वर्षी त्यांनी पूर्णाई गूळ निर्मीती उद्योग स्थापन करून गूळ निर्मीती सुरू केली त्यासाठी त्यांनी मित्र परिवार यांच्या सहकार्याने गावातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित केले त्यामुळे आत्ता या भागात शंभर ते दीडसे एकर उसाचे क्षत्र तयार झाले आहे .त्यामुळे आत्ता भागातील शेकडो कामगारांना रोजगार मिळत आहे या भागातील हजारो ऊस तोड कामगार हें कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी ऊस तोडीला जातात मात्र आत्ता पूर्णाई गूळ उद्योगामुळे आत्ता या परिसरात 40 ते 50 टोळ्या ऊस तोडीचे काम करत आहेत विशेष म्हंजे मध्येप्रदेशातील 60ते 70 कामगार या ठिकाणी काम करत आहेत त्याच बरोबर सात ते आठ टैक्ट्रर धारकांना देखील काम मिळत आहे आणि विशेष म्हंजे थिटे कुटुंबानी शासनाच्या कुठल्याहि  मदतीविना हा उद्योग उभारला आहे त्यामुळे याबद्दल तालुक्यातील शेतकरी व विविध स्तरावरुन त्याचे कौतुक केले जात आहे तसेंच यापुढे हि गावातील 30ते 40 कुटुंबाला एकत्र करून दुग्ध व्यवसायाकडे देखिल वाटचाल चालु असल्याचे उद्योग समूहाचे मार्गदर्शक शंकर थिटे यांनी सांगितले आहे 


**********************************************

प्रतिक्रिया 

मी मुंबई येथे नौकरी करत असतांना जेव्हा जेव्हा गावाकडे यायचो तेव्हा आपल्या गावासाठी व आपल्या भागात काहीतरी करावे असे वाटत असे त्यामुळे मी पूर्णाई गूळ निर्मितीचा उद्योग साकारला आहे व तसेंच गावातील तरुण मुलांना स्पर्धा परीक्षाच्या तयारी साठी स्थानिक पातळी वर वेगवेगले शिबिर घेणे चालू केले आहे तसेंच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी छोटे मोठे काही उद्योग व्यवसाय कारणासाठी चर्चा देखिल घेण्यात येते 

शंकर थिटे खरदडी .ता .जिंतूर .जिल्हा परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या