💥पुर्णेतील रेल्वे उड्डाण पुल बांधकाम गुत्तेदार कंपनी 'गॅलकॉन इन्फरा प्रोजेक्ट प्रा.लि.च्या' साहित्याची चोरी....!


💥चोरी प्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही ?💥 

पुर्णा (दि.२९ नोव्हेंबर) - पुर्णा-हिंगोली-नांदेड लोहमार्गावरील उड्डाण पुल बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फरा प्रोजेक्ट प्रा.लि.च्या' १ लाख ५ हजार रुपयाच्या लोखंडी साहित्याची येथील पुर्णा-नांदेड मार्गावरील चानक्य नगरी लगतच्या अधीर जैस्वाल यांच्या मालकीच्या जागेतून धाडसी चोरी झाल्याची गंभीर घटना काल सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या मध्यरात्री ०३-०० ते पहाटे ०६-०० वाजेच्या दरम्यान घडल्याचे वृत्त कंपनी सुत्रांकडून मिळाले असून या घटने संदर्भात पोलिस स्थानकात अद्याप पर्यंत कुठलाही गुन्हा का दाखल करण्यात आला नसल्यामुळे या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


या घटने संदर्भात 'गॅलकॉन इन्फरा प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीचे डायरेक्टर श्री.रामु कुंडेटी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की या चोरीच्या घटने संदर्भात कंपनीचे अधिकृत प्रोजेक्ट मॅनेजर  व पिआरओ राजेश सेन हे पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यास गेले असता संबंधित पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीचे डायरेक्टर यांना आणल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले असल्याचे श्री कुंडेटी म्हणाले त्यामुळे या घटने संदर्भात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येत असून या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी अत्यंत जड असे 'यु जॅक स्क्रू टाईप' एकून ६० नग प्रती नग किंमत ५००/-रुपयें एकून किंमत ३०,०००/- रुपये )तिस हजार रुपये),ब्रेसींग पाईप एकून ६० नग प्रती ब्रेसींग पाईप नग ११००/- रुपये एकून किंमत ६६,०००/-रुपये (सहासष्ट हजार रुपयें),ग्रेडर शटरींग प्लेट एकून शटरींग प्लेट नग २ प्रती नग ४५००/-रुपयें एकून किंमत ९०००/- रुपये (नऊ हजार रुपये) असा एकंदर १,०५०००/-रुपयांचा (एक लाख पाच हजार रुपये) मुद्देमाल अगदी सहजपणे चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली असून या घटने संदर्भात मात्र गुन्हा दाखल करण्यास का टाळाटाळ केली जात आहे ? असा प्रश्न जनसामान्यात उपस्थित होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या