💥स्वताचा जीव धोक्यात घालून तिने वाचवले आपल्या पिल्लांचे प्राण....!


💥त्या वानराच्या पिल्लांच्या आईने आपला जीव धोक्यात घालून आपल्या पिल्लाला जवळ घेतले💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रा( बु )येथील विद्यूत प्रवाह चालू असतांना वानरांचे पिलू खेळता खेळता अचानकपणे विद्यूत तारेला स्पर्श झाला व वानरांचे पिल्लू रोहित्रा वर कोसळून पडले त्यामुळे अनेक वानर त्या ठिकाणी जमा झाले मात्र त्या पिल्ला जवळ जाण्यासाठी कोणतेही वानर तयार नव्हते परंतु त्या पिल्लांच्या आईने आपला जीव धोक्यात घालून आपल्या पिल्लाला जवळ घेतले या वेळी आईचे मातृत्व  पहावयास मिळाले आहे 


सेनगाव तालुक्यातील केंद्रा( बु )येथील बस थांबाफूलाजवळ असलेल्या विद्यूत रोहित्रवर एका वानरांच्या पिल्लाने उडी मारून खेळण्याच्या नांदत विद्यूत प्रवाह चालु असलेल्या ताराला पकडले मात्र एका क्षनात ते पिल्लू रोहित्रावर कोसळले वानरांचे पिलू कोसळून पडल्याने सर्व वानर एका जागी जमा झाले मात्र एक वानर त्या पिल्ला रोहित्रा वरून काढण्यासाठी समोर आले नाही मात्र आईचे मातृत्वं पाहायला मिळाले तिने आपला स्वताचा जीव धोक्यात घालून आपल्या पिल्लाचे प्रान वाचवले पिल्याच्या आईने समोर जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पिलाला त्या रोहित्रा वरून  अलगद उचलून आपल्या जवळ घेऊन कुशीत घेतले.

 प्राण वाचल्यामुळे आई आणि त्या पिलाला मोठा आनंद झाला. माया ममता ही केवळ मानवापुरतीच नसून प्रत्येक मुक्या प्राण्यानमध्ये व पक्षान मध्ये देखील पहावयास मिळते. असाच हा एक क्षण स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पिलाला वाचवण्यात एक आई यशस्वी झाली. हे पाहणाऱ्याच्या नजरेतून चुकले नाही. एकंदर स्वतःचा जीव धोक्यात घालून एका वानराने पिलाचा जीव त्याच्या आईने वाचविला हे बसस्थानकावरील अनेकांनी अनुभवले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या