💥प्राजक्ता माळीने जिंकली जिंतूरकरांची मने नृसिंह प्रतिष्ठानतर्फे स्नेहमिलन...!

💥होम मिनीस्टर स्पर्धा ठरली लक्षवेधी💥

जिंतूर (दि.10 नोव्हेंबर) : येथील श्री. नृसिंह प्रतिष्ठान आयोजित दीपावलीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमिलनात महाराष्ट्राची हास्यजत्रा तथा प्रसिध्द सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी हीने हजेरी लावून जिंतूरकरांची मने जिंकली.


                  जिंतूर येथील चिंतामणी पार्कच्या प्रांगणातील या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संचालक उद्धव केपी यांच्या रंगतदार व चतुरस्त्र संचलनाने कार्यक्रम बहारदार झाला. यावेळी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात प्रथम पारितोषिक (फ्रिज)  सौ. जयश्री मसुरे तर द्वितीय पारितोषिक (वाशिंग मशीन) सौ. राधाबाई सडाळ व तृतीय पारितोषक (पिठाची गिरणी) सौ. कमलबाई रोकडे यांनी पटकाविले. यावेळी 21 विजेत्या महिलांना मानाची पैठणी देण्यात आली.


                   मागील 8 वर्षांपासून माजी आमदार विजयराव भांबळे यांच्यावतीने दिवाळीनिमित्त स्नेहमीलनचा उपक्रम आयोजित करण्यात येतो आहे. या उपक्रमात यावेळी  सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीने कार्यक्रम लक्षवेधी ठरला. विशेषतः प्राजक्ता माळी यांनी सर्वांशी संवाद साधला व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला माझ्या माहेरी आल्या सारखे वाटत आहे, अशी भावना व्यक्त केली.

                     यावेळी प्रेक्षा भांबळे यांनी, आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा माझ्या सारख्या छोट्या भगिनीच्या पाठीशी आहे म्हणून आज हा कार्यक्रम आपण यशस्वी पार पाडू शकलो, असे मत व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या