💥तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये अतिवृष्टी ; काही भागात पूराचा अलर्ट....!


💥हवामान खात्याचा मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा💥

(चेन्नई प्रतिनिधी),

पूर्वोत्तर मॉन्सूनमुळे तामिळनाडूमध्ये अतिवृष्टी होत आहे अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अतिवृष्टीने बंधाऱ्यात आणि धरणात पाणीसाठा वाढल्याने धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानेही काही भागात अतिवृष्टीमुळे पूर येण्याचा इशारा दिला आहे.

तामिळनाडूतील थेनी, डिंडीगुल, मदुरै, शिवगंगा और रामनाथपुरम जिल्ह्यात पूराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे थैनी-वैगेई बंधाऱ्यातून ४,२३० घनफूट अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे तामिळनाडूची राजधानी चैन्नईमध्ये अनेकठिकाणी पाणी साचले आहे चितलापक्कम कालव्याचे पाणी निवासी भागात शिरले आहे.

हवामान खात्यानेही काही भागात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अलर्ट दिला आहे तामिळनाडू मध्ये आणखी काही दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे काही ठिकाणी गडगटासह पावासाचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे तामिळनाडूत काही दिवसांपासून शाळा बंद आहेत चेन्नईत अतिवृष्टीने गेल्या ३० वर्षातील विक्रम मोडीत काढला आहे.नुंगमबक्कममध्ये १ नोव्हेंबर २०२२ला ८ सेंटीमीटर पावसाचीनोंद झाली आहे. 

हा ३० वर्षातील विक्रम आहे गेल्या ७२ वर्षात तिसऱ्यांदा एवढा मोठा पाऊस झाला आहे. याआधी १९९० मध्ये चेन्नईत १३ सेंटीमीटर पाऊस झाला होता तर १९६४ मध्ये ११ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली होती विशेष म्हणजे या दोन्ही घटना १ नोव्होंबर लाच घडल्या होत्या. बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबामुळे आणखी काही दिवस तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या