💥पूर्णेत स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या जयंती व संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता परिषद संपन्न....!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रत्नाकर गुट्टे तर प्रमुख वक्ते म्हणून दंगा मुक्त अभियानाचे अध्यक्ष शेख सुभान यांची उपस्थिती💥 


पुर्णा (दि.२१ नोव्हेंबर) - येथील हजरत टिपू सुलतान मित्र मंडळाच्या वतीने पूर्णा येथे स्वतंत्रतासेनानी टिपू सुलतान यांच्या जयंती व संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता परिषद संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे व प्रमुख वक्ते म्हणून दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे अध्यक्ष शेख सुभान अली ह्यानी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

यावेळी शेख सुभान अली यांनी ह.टिपू सुलतान यांचा राज्यघटनेत असलेला फोटो दाखवीत टिपू सुलतान यांच्या विविध यांत्रिकी अविष्कारावर प्रकाश टाकला. त्यासोबत उपस्थिताना लोकहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.आमदार रत्नाकर गुट्टे यांनी विविध महापुरुषांच्या जयंती साजरे करण्यासोबतच त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

यावेळी संविधान गौरव सोहळ्याचे संयोजक प्रकाश कांबळे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे, पूर्णा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुभाष मारकड, मौलाना रशीद बरकाती व ॲड.शेख अथर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी, नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, जगदीश जोगदंड सर, युवा नेते अमजद नुरी, प्रा. अब्दुल अन्सार, जामा मस्जिद कमिटीचे नासेर थारा, रऊफ कुरेशी सर, माजी नगरसेवक मगदुम कुरेशी, एमआयएम चे तालुकाध्यक्ष मोहम्मद शफिक, जावेद सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सय्यद कलीम सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक सरान बागबान, शेख अक्रम (पत्रकार), शेख वसीम, शेख बब्बू, अकरम, शेख आसेफ, शेख अर्शद, शेख अन्वर, शेख असिफ, शेख आमेर, शेख गौस इत्यादीनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या