💥वैद्यनाथ महाविद्यालयाच्या सदस्यत्वाची आ.धनंजय मुंडेसह 400 जणांना सदस्य म्हणून न्यायालयाची मान्यता....!


💥जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या सदस्यत्वाचे प्रकरण गेल्या 13 वर्षांपासून न्याय प्रविष्ट होते💥 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळ अंतर्गत वैद्यनाथ महाविद्यालयाचा सन 2009 पासून कोर्टात प्रलंबित असलेला खटला आज निकाली लागला. आ.धनंजय मुंडेसह 400 जणांना सदस्य म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

     परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या सदस्यत्वासाठीचे प्रकरण गेल्या 13 वर्षांपासून न्याय प्रविष्ट होते. त्या प्रकरणाचा आज निकाल   लागला आहे. सन 2009 पासून कोर्टात प्रलंबित असलेला वैद्यनाथ महाविद्यालयाचा खटला आज निकाली लागला. न्यायालयाने आ.धनंजय मुंडेसह,सौ.राजश्रीवहिनी मुंडे,अजय मुंडे, माजी आ.संजयभाऊ दौंड यांच्या सह इतर 400 जणांना सदस्य म्हणून मान्यता दिली आहे. जवळपास 13 वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाला न्यायदेवतेने न्याय दिला.सत्य कितीही दडवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपून राहत नाही. आता वैद्यनाथ महाविद्यालयही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वछायेत येणार.आणि या  न्यायालयाच्या लढ्यात

 श्री सदाशिवअप्पा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य जबाबदारी निभावली  असे नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.प्रदीप खाडे सर , खूप मेहनत घेऊन नियोजनबध्द समीकरण जुळवून न्यायालयीन  लढा जिंकला आहे. यासाठी  अँड सतीश काळम पाटील अंबाजोगाई व बाळासाहेब गित्ते काम पाहिले बीड आ.धनंजय मुंडेसह 400 जणांना सदस्य म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या