💥सेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार....!


💥सेटची परिक्षा 26 मार्च 2023 मध्ये होणार💥 

✍️ मोहन चौकेकर 

सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात 'सेट'साठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील, तर 26 मार्च 2023 रोजी ही परीक्षा होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी 'सेट' परीक्षा घेण्यात येते. यंदा 38 व्या परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

*महत्वाच्या तारखा*

▪️ 10 ते 30 नोव्हेंबर - ऑनलाईन अर्ज करता येणार

▪️ 1 ते 7 डिसेंबर - विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल

▪️ 26 मार्च 2023 - परीक्षेची तारीख

*येथे करा अर्ज -*  https://setexam.unipune.ac.in

 पुणे विद्यापीठाने 'सेट' परीक्षेची पूर्ण तयारी केली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर लगेच 'सेट' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव व सेटच्या आयोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या