💥परभणी जिल्ह्यातील दुर्धर आजारग्रस्त 245 बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हसू....!


💥जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या पुढाकाराने बालसंगोपन योजनेचा लाभ💥

परभणी (दि.07 नोव्हेंबर) : ‘एड्स’ असा साधा शब्दही उच्चारला तरी समाज नाके मुरडतो. अशा समाजात राहणा-या मुलांच्या नशिबी अगदी बालवयातच ही पीडा येते. तेव्हा मात्र त्याच समाजातील, जिल्हा प्रशासनातील काही सहृदय व्यक्ती विधायक कामासाठी एकत्र येतात आणि या बालकांच्या चेह-यावर हसू फुलते. असाच प्रकार जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 245 बालकांनी नुकताच अनुभवला. निमित्त होते, एकाच छताखाली शासनाच्या विविध विभागांना एकत्र आणून योजनेचा लाभ मिळावा, यासाठी झगडणाऱ्या बालकांना विविध प्रमाणपत्रे विनासायास मिळवून देण्याचे !

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी दुर्धर आजाराचा सामना करणाऱ्या या बालकांना 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2022 या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालयाच्या विद्यमाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला.

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार गणेश चव्हाण, जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. कुलकर्णी, स्वयंसेवी संस्थेच्या श्रीमती बबिता मॅडम, श्री. लोळगे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे गजानन पटवे, श्री. देशमुख, आम्रपाली पाचपुंजे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्री. कातनेश्वर, आऊट रिच वर्कर राहुल देशमुख, मिलींद साळवी व सर्व सदस्य, परीविक्षा अधिकारी श्रीमती मनतकर आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी सहकार्य केले.

पालक किंवा 18 वर्षाखालील मूल एड्स या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे, अशा 245 बालकांना जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये बालसंगोपन या योजनेचा लाभ देण्यात आला. या शिबिरात उत्पन्नाचे प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँक पासबुक असे विविध लाभ एकाच छताखाली देण्यात आले. सहभागी लाभार्थ्यांनी मिळालेल्या सेवेसाठी समाधान व्यक्त करत जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

या योजनेत सर्व 245 बालकांना त्यांच्या शिक्षणासाठी वयाच्या 18 वर्षापर्यंत दरमहा अकराशे रुपये मिळणार आहेत. या शिबिरात उत्पन्न प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँक पासबुक असे विविध लाभ एकाच छताखाली देण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Tablet andsmartphonegamers and sports bettors can take pleasure in real-money on-line casino and sports gambling forAndroidand iOS units. Pick a gambling site that gives no-hassle, downloadable apps and instant-play video games. We fee the casinos that provide roulette players the most effective worth, with as small a minimize as attainable going to the casino from your wager. Any top-rated roulette casino on-line will supply aggressive payout percentages with the most 카지노 사이트 effective return to player out there, so have the ability to|you probably can} take pleasure in great odds when you play. There is also be|can be} one more bet, referred to as a ‘neighbours’ bet, during which the players bet on 5 consecutive roulette numbers, as seen on the roulette wheel. This bet isn't as well-liked however has also proven its value by rewarding players with some of the the} biggest roulette wins, and you may learn extra about them here.

    उत्तर द्याहटवा