💥परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना काम वाटप समितीची उद्या दि.23 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे बैठक...!


💥इच्छुक सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी आवश्यक कागदपत्रासह बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन - सचिव

परभणी (दि. 22 नोव्हेंबर) : परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना लॉटरी पध्दतीने काम वाटप करण्यासाठी गठीत केलेल्या समितीची बैठक उद्या बुधवार दि.23 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 01-00 वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी कामे घेण्यास इच्छुक सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी आवश्यक कागदपत्रासह बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सदस्य सचिव काम वाटप समिती तथा सहाय्यक अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड  यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या