💥‘परभणी ग्रंथोत्सव-2022’चे सोमवारी उद्घाटन....!


💥या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ कवी प्रा.इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ११-०० वाजता होणार आहे💥

परभणी (दि. 24 नोव्हेंबर) : उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गंत ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि  जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यावतीने जिल्हा ग्रंथालय कार्यालय, वसमत रोड येथे सोमवारपासून (दि. 28)  दोन दिवसीय ‘परभणी ग्रंथोत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ११ वाजता होणार आहे.

पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय दरम्यान ग्रंथदिंडी निघेल. परभणी ग्रंथोत्सव २०२२ समन्वय समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

प्रमुख अतिथी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीमती फौजिया खान, खासदार  संजय जाधव, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, बाबाजानी दुर्राणी, विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, रत्नाकर गुट्टे, आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर आणि सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे  यावेळी उपस्थित राहतील.

सोमवारी दुपारी दोन वाजता ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: मराठवाडा मुक्ती संग्राम आणि परभणी जिल्हा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक कोषागार अधिकारी निळकंठ पाचागे असतील तर प्राचार्य डॉ. दिनानाथ फुलवाडकर, दिनकर देशपांडे, बाळु बुधवंत आणि संपादक विजय कुलकर्णी  यामध्ये आपले विचार मांडतील. तिसरे सत्र दुपारी तीन वाजता कथा-कथनाने सुरु होईल. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कथाकार राजेंद्र गहाळ असतील. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बा. बा. कोटंबे करतील. तर कथा-कथनामध्ये श्रीमती सरोजताई देशपांडे, बबन आव्हाड आणि शिवदास पोटे सहभागी होतील.

ग्रंथोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी (दि.२९ नोव्हें.)  सकाळी अकरा वाजता 'लावा बालमनाला वाचनाची गोडी' कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथमित्र प्रा. डॉ. रामेश्वर पवार राहणार असून, ज्ञा. श्री. मुंढे, अनिल स्वामी, विनोद शेंडगे आणि श्रीमती कल्पना हेलसकर या सहभागी असतील.

दुस-या सत्रात दुपारी दोन वाजता काव्यवाचनाला सुरुवात होणार असून, प्रसिद्ध साहित्यिक केशव बा. वसेकर अध्यक्षस्थान भूषवणार असून, सूत्रसंचालन महेश देशमुख करणार आहेत. तर प्रसिद्ध कवी रेणु पाचपोर, सुरेश हिवाळे, केशव खटींग, हनुमान व्हरगुंळे, शिवाजी मरगीळ, तुकाराम खिल्लारे, राजेश यवले, पल्लवी देशपांडे, संतोष नारायणकर, अरविंद सगर, सदाशिव वसेकर, प्रणिता रायखेलकर, संजीवनी खोत, अनुराधा वायकोस, राजेंद्र कोराणे, मधुरा उमरीकर, अविनाश खोकले, महेश कोरडे, भाऊसाहेब मकपल्ले, यशवंत मस्के, आत्माराम जाधव, संजय तिडके, गजेंद्र भोसले, डॉ. अशोक केंद्रे, विठ्ठलराव चव्हाण, यशवंत मकरंद, डॉ. कल्याण गोपनर, रवि कात्नेश्वर, प्रेमानंद बनसोडे, डॉ. अशोक पाठक, यशवंत पाटील, डॉ. पांडूरंग काळे, शरद ठकार, आत्माराम कुटे आणि गणेश आघाव या प्रसिद्ध कवींच्या कविता ऐकायला मिळतील.

सायंकाळी चार वाजता 'ई -ग्रंथालय अज्ञावलीत ऑफ लाईन डाटा एंट्री' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्ष स्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. संतोष कदम असतील. स्वा. सै. सू. पवार महाविद्यालय पुर्णाचे ग्रंथपाल डॉ. विलास काळे आणि श्री. शिवाजी महाविद्यालय परभणीचे ग्रंथपाल डॉ. रामदास टेकाळे मार्गदर्शन करतील. परभणी ग्रंथोत्सवाला सहभागी सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ग्रंथोत्सवातील ग्रंथप्रदर्शन व विक्री दोन्ही दिवस सकाळी दहा वाजेपासून सुरु राहील. जास्तीत जास्त वाचक, साहित्यप्रेमी नागरिकांनी या ग्रंथोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव संयोजन समितीच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, सदस्य शिक्षणाधिकारी आशा गरूड, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्कर पिंपळकर, म.सा.प. परभणीचे अध्यक्ष आसाराम लोमटे, प्रकाशन प्रतिनिधी केशव बा. वसेकर आणि सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी बा. सं. कातकडे यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या