💥साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून 2022-23 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेसाठी अर्ज आमंत्रित...!


💥इच्छुक अर्जदारांकडून 20 डिसेंबरपर्यंत कर्ज प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत असल्याचे जिल्हा व्यवस्थापकांनी चंद्रकांत केले आहे💥

परभणी (दि. 22 नोव्हेंबर) :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून 2022-23 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांकडून 20 डिसेंबरपर्यंत कर्ज प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत साठे यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुकांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हे अर्ज मागविण्यात येत असून, यासाठी त्यांना 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण व 50 पेक्षा जास्त नसावे. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे. आणि त्याने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराने अर्ज तीन प्रतींमध्ये मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून दाखल करावा.

  इच्छुक अर्जदारांनी योजनेच्या अटी व शर्थी आणि अधिक माहितीसाठी 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड परभणी येथे अर्ज करावेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या